फोटो सौजन्य: iStock
भारतामध्ये बजेट फ्रेंडली बाईकसोबतच हाय परफॉर्मन्स बाईक देखील मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. देशातील विविध बाईक उत्पादक कंपन्यांमध्ये रॉयल एन्फिल्ड ही एक प्रमुख कंपनी आहे. रॉयल एन्फिल्डने भारतीय बाजारात अनेक उत्कृष्ट बाईक ऑफर केल्या आहेत, ज्यामुळे या कंपनीचे बाईक विशेष आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. या कंपनीच्या बाईकची डिझाइन, गुणवत्ता आणि परफॉर्मन्स यामुळे तिच्या बाईकला वेगळीच लोकप्रियता मिळाली आहे. रॉयल एन्फिल्डची क्रेझ बाजारात फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते.
रॉयल एन्फिल्डची सर्वात लोकप्रिय बाईक म्हणजे Royal Enfield Classic 350. दिवसेंदिवस या बाईकची क्रेझ ही वाढताना दिसत आहे. आता कंपनी ब्रिटिश ऑटोमेकरची ही बाईक 648 सीसी इंजिनमध्ये आणण्यास सज्ज आहे. रॉयल एनफील्ड क्लासिक 650 येत्या 27 मार्च 2025 रोजी भारतात लाँच होणार आहे. ही बाईक क्लासिक 350 आणि त्याच्या ट्विन इंजिनचे उत्तम कॉम्बिनेशन असणार आहे.
TVS Jupiter की Honda Activa, इंजिन, फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत कोणती स्कूटर आहे बेस्ट?
रॉयल एनफील्ड क्लासिक 650 मध्ये 648 सीसी, एअर/ऑइल कूल्ड, पॅरलल ट्विन मिल इंजिन असणार आहे. या इंजिनची आधीच टेस्टिंग घेण्यात आली आहे. या बाईकमधील इंजिन 47 एचपी पीक पॉवर आणि 52 एनएम टॉर्क निर्माण करेल. या बाईकच्या इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध असेल.
रॉयल एनफील्डच्या अशा अनेक बाईक्स आहेत ज्यात 648 सीसी इंजिन वापरले गेले आहे. या बाईकच्या यादीमध्ये सुपर मेटीओर 650 , बेअर 650 , इंटरसेप्टर 650 , शॉटगन 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी यांचा समावेश आहे. आता या यादीत क्लासिक 650 चे नावही जोडले जाणार आहे.
तापत्या उन्हापासून कारच्या पेंटचा बचाव कसा कराल? ‘या’ सोप्या टिप्स ठेवा लक्षात !
रॉयल एनफील्डच्या या बाईकमधे मध्ये फायनल ड्राइव्ह गिअरिंगमध्ये अनेक समान फीचर्स आहेत. पण या बाईकमध्ये काही गोष्टी वेगळ्या आहेत. क्लासिक 650 मध्ये पुढच्या बाजूला 19-इंच वायर-स्पोक व्हील्स आणि मागच्या बाजूला 18-इंच वायर-स्पोक व्हील्स आहेत. शॉटगन 650 मध्ये पुढील बाजूस 18-इंच अलॉय व्हील्स आणि मागील बाजूस 17-इंच अलॉय व्हील्स वापरण्यात आले आहेत.
रॉयल एनफील्ड क्लासिक 650 भारतीय बाजारात चार रंगांच्या पर्यायांसह लाँच होऊ शकते. यात रेड, ब्लू, टील और ब्लॅक क्रोमचा समावेश आहे. या बाईकची किंमत Super Meteor 650 आणि Shotgun 650 च्या श्रेणीत देखील असू शकते. सुपर मीटीओर 650 ची एक्स-शोरूम किंमत 3.64 लाख रुपयांपासून सुरू होते. तर शॉटगन 650 ची एक्स-शोरूम किंमत 3.59 लाख रुपयांपासून सुरू होते.