'या' डिझेल कारकडून फुल टॅंकवर 2,831 किमीचे अंतर पार!
ग्राहक नेहमीच कार खरेदी करताना मायलेजचा विचार करतात. म्हणूनच तर उत्तम मायलेज मिळावा म्हणून अनेक जण इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार्सना पेट्रोल आणि डिझेलच्या कार्सपेक्षा जास्त प्राधान्य देत आहेत. मात्र, मायलेजच्या बाबतीत चक्क एका डिझेल कारने बाजी मारली आहे.
ऑटोमोबाईल उद्योग वेगाने इलेक्ट्रिक वाहनांकडे वाटचाल करत असताना, एका डिझेल सेडानने सर्वांना अचंबित केले आहे. या नवीन जनरेशनच्या Skoda Superb 2.0 TDI ने दमदार कामगिरी केली. या कारने डिझेलच्या एकाच टँकवर चक्क 2,831 किलोमीटर अंतर कापून एक नवा जागतिक विक्रम म्हणजेच वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. ही कामगिरी केवळ ड्रायव्हरच्या परिश्रमाची पावती नाही तर उत्कृष्ट इंजीनिअरिंग, एरोडायनॅमिक डिझाइन आणि डिझेल इंजिनच्या कार्यक्षमतेचे एक ज्वलंत उदाहरण आहे.
नवीन 2026 Kawasaki Z650 S झाली सादर, मिळणार नवीन डिझाइन आणि फीचर्स
हा रेकॉर्ड पूर्णपणे स्टॅंडर्ड Skoda Superb 2.0 TDI ने प्रस्थापित केला आहे. या कारमध्ये कोणतेही परफॉर्मन्स ट्यूनिंग किंवा विशेष बदल करण्यात आले नाहीत. ही कार एसेन्स ट्रिममध्ये होते, ज्यामध्ये 2.0-लिटर चार-सिलेंडर टर्बोडीझेल इंजिन होते जे 148 बीएचपी आणि 360 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 7-स्पीड डीएसजी गिअरबॉक्स आणि फ्रंट-व्हील ड्राइव्हशी जोडलेले आहे. या कारचे अधिकृत मायलेज 4.8 लिटर प्रति 100 किमी (अंदाजे 20.8 किमी प्रति लिटर) नोंदवली गेली आहे.
युरोपच्या रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान या कारने डबल मायलेज दिले आहे. फक्त 2.61 लिटर प्रति 100 किमी, म्हणजेच जवळपास 38.3 kmpl इतका सरासरी मायलेज मिळाला. हा तोच मायलेज आहे जो साधारणपणे छोट्या हॅचबॅक कार्स देतात. पण येथे हा मायलेज 5 मीटर लांब आणि 1.6 टन वजनाच्या एक्झिक्युटिव्ह सेडानने दिला आहे. रेकॉर्डसाठी 66-लिटरचा फ्युएल टँक पूर्णपणे भरला गेला होता. कार चालवताना त्याच्या वेगापेक्षा जास्त लक्ष मायलेजवर केंद्रित केले होते.
New Hyundai Venue आली रे! फक्त ‘इतक्या’ हजारात बुक करा SUV आणि 4 नोव्हेंबरला डायरेक्ट चावी खिशात
या यशामागे फक्त कारचे उत्कृष्ट ड्राइव्हट्रेन आणि एअरोडायनॅमिक्स नव्हते तर योग्य नियोजन आणि अचूक ड्रायव्हिंग टेक्निक्स देखील होती. या कारला Eco मोडमध्ये चालवण्यात आले, ज्यामुळे थ्रॉटल रिस्पॉन्स हलका आणि गिअर बदलणे अधिक स्मूथ झाले. या कारचा सरासरी वेग 80 kmph ठेवण्यात आला होता.






