फोटो सौजन्य: X.com
भारतीय महिला संघाने साऊथ आफ्रिकेला हरवत Women’s World Cup आपल्या नावावर केले आणि संपूर्ण भारतात पुन्हा एकदा दिवाळी साजरा झाली. भारतीय महिला संघावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. नुकतेच Tata Motors ने अलीकडेच एक महत्वाची आणि मोठी खास घोषणा केली आहे.
2025 चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूला कंपनीने त्यांची आगामी नवीन Tata Sierra SUV भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरी आणि त्यांच्या ऐतिहासिक विजयाच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
एका लिटर पेट्रोलमध्ये New Hyundai Venue किती मायलेज देईल?
टाटा मोटर्स येत्या 25 नोव्हेंबर रोजी त्यांची आयकॉनिक एसयूव्ही, सिएरा लाँच करणार आहे. ही एसयूव्ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात प्रगत आणि वैशिष्ट्यपूर्ण कार असेल. यात सुधारित आधुनिक एक्सटिरिअर डिझाइन, प्रीमियम इंटिरिअर आणि लक्झरी फीचर्स असतील. नवीन सिएरामध्ये तीन डिजिटल स्क्रीन, बसण्याची उत्कृष्ट सोय आणि ड्रायव्हिंग सोपे करणारी अनेक फीचर्स असतील.
विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूला टाटा सिएराचा टॉप व्हेरिएंट भेट म्हणून दिला जाईल. संघात कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, रेणुका सिंग आणि राधा यादव यांच्यासह 16 खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी विश्वचषकातील अंतिम सामन्यात साऊथ आफ्रिकेला हरवून चांगली कामगिरी केली आणि भारताचे नाव उंचावले. म्हणूनच टाटा मोटर्सने त्यांच्या कठोर परिश्रम आणि संघभावनेची दखल घेत ही खास भेट देण्याचा निर्णय घेतला.
CNG भरताना आपल्याला ड्रायव्हर कारमधून का उतरवतो? फक्त सेफ्टी नव्हे तर ‘ही’ देखील आहेत कारणं
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ शैलेश चंद्रा म्हणाले, “भारतीय महिला क्रिकेट संघाने त्यांच्या अपवादात्मक कामगिरीने संपूर्ण देशाला गौरव मिळवून दिला आहे. या दिग्गज खेळाडूंना आमची नवीन टाटा सिएरा एसयूव्ही भेट देताना आम्हाला अभिमान आहे. हा सन्मान त्यांच्या धैर्य, समर्पण आणि कामगिरीचा सन्मान आहे.”
Ans: Tata Motors ने Women’s World Cup 2025 जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूला त्यांची आगामी Tata Sierra SUV चे टॉप मॉडेल भेट देण्याची घोषणा केली आहे.
Ans: Tata Motors 25 नोव्हेंबर रोजी नवीन पिढीची Tata Sierra SUV अधिकृतरित्या लाँच करणार आहे. ही कंपनीची सर्वात आधुनिक आणि प्रीमियम SUV मानली जात आहे.
Ans: एकूण 16 खेळाडूंना—कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, रेणुका सिंग, राधा यादव इत्यादींसह—नवीन Tata Sierra टॉप व्हेरिएंट भेट मिळणार आहे.






