फोटो सौजन्य: Pinterest
वाहन उत्पादक कंपनी ‘टोयोटा’ भारतीय वाहन बाजारात विविध सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री करते. MPV सेगमेंटमध्ये, ही कंपनी ‘टोयोटा इनोव्हा क्रिस्टा’ (Toyota Innova Crysta) ही कार उपलब्ध करून देते. जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या अहवालात आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत की 5 लाखांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल?
आता तुमची जुनाट कार देखील देईल नव्या सारखा मायलेज! फक्त जाणून घ्या RPM चं सोपं गणित
टोयोटाकडून इनोव्हा क्रिस्टा ही लोकप्रिय MPV भारतात अनेक व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. यातील बेस व्हेरिएंट 2.4 GX 8 Str असून, या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे 18.99 लाख रुपये आहे. जर ही गाडी दिल्लीमध्ये खरेदी केली, तर RTO साठी सुमारे 2.37 लाख रुपये आणि इन्शुरन्ससाठी जवळपास 1.02 लाख रुपये खर्च येतो. याशिवाय TCS चार्ज म्हणून सुमारे 19 हजार रुपये द्यावे लागतात. त्यामुळे या गाडीची ऑन-रोड किंमत साधारण 22.57 लाख रुपयांच्या आसपास जाते.
जर तुम्ही या कारच्या बेस व्हेरिएंटसाठी 5 लाख रुपये डाउन पेमेंट दिले, तर उर्वरित सुमारे 17.57 लाख रुपये बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. जर हे कर्ज 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी घेतले, तर तुम्हाला दर महिन्याला सुमारे 28,282 रुपयांचा EMI भरावा लागेल.
7 वर्षांच्या कालावधीत तुम्ही सुमारे 6.18 लाख रुपये फक्त व्याज म्हणून भराल. यामुळे कारची एकूण किंमत (एक्स-शोरूम + ऑन-रोड + व्याज) मिळून साधारण 28.75 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.
इनोव्हा क्रिस्टा ही MPV सेगमेंटमधील मजबूत पर्याय असून तिचा थेट मुकाबला Maruti Ertiga आणि Kia Carens Clavis सारख्या बजेट MPV कार्सशी होतो. याशिवाय SUV सेगमेंटमधील Mahindra Scorpio, Mahindra XUV700, MG Hector आणि Tata Safari यांच्याकडूनही या गाडीला कडवी स्पर्धा मिळते.






