संग्रहित फोटो
टीव्हीएस मोटर कंपनीची प्रमुख स्कूटर आणि भारतातील तेजीत असलेल्या स्कूटर बाजारपेठेतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर, ज्युपिटरने देशांतर्गत बाजारपेठेत ९० लाख (९ दशलक्ष) युनिट्सच्या घाऊक विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. TVS ज्युपिटर दररोज सरासरी 4 हजार ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. १६ सप्टेंबर २०१३ रोजी लॉन्च झालेल्या ज्युपिटर स्कूटर ब्रँडने, प्रथम ११० सीसी मॉडेल आणि नंतर १२५ सीसी अवतारात, मार्च २०२६ अखेरपर्यंत एकूण ९०,१०,१८० युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या १३ आर्थिक वर्षांमध्ये सुमारे १,५४,००० युनिट्सची निर्यातही करण्यात आली आहे.
TVS ज्युपिटरने विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आपल्या दमदार परफॉर्मन्स आणि मायलेजमुळे या स्कूटरने ग्राहकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. TVS ज्युपिटरने भारतातील वेगाने वाढणाऱ्या स्कूटर मार्केटमध्ये मोठे स्थान मिळवले आहे. TVS च्या या लोकप्रिय स्कूटरने आता देशांतर्गत बाजारात 90 लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. 16 सप्टेंबर 2013 रोजी लाँच करण्यात आलेली ही स्कूटर सुरुवातीला 110 सीसी मॉडेल म्हणून आली होती, त्यानंतर ती 125 सीसी व्हर्जनमध्ये देखील ऑफर करण्यात आली. मार्च 2026 च्या अखेरीस, ज्युपिटरची एकूण विक्री 90,10,180 युनिट्सवर पोहोचली आहे.
ज्युपिटर ही भारतातील नंबर 1 स्कूटर होंडा अॅक्टिव्हाची सर्वात मोठी स्पर्धक ठरली आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये ही TVS ची सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी आहे. विशेष म्हणजे त्याची विक्री अपाचे सीरीज, रेडर 125 आणि एनटॉर्क 125 सारख्या इतर लोकप्रिय टीव्हीएस मॉडेल्सच्या एकूण विक्रीपेक्षा जास्त आहे.
ज्युपिटरचा वाढीचा प्रवासही खूप मनोरंजक राहिला आहे. मे 2015 पर्यंत 5 लाख युनिट्स, जून 2016 पर्यंत 10 लाख युनिट्स, सप्टेंबर 2017 पर्यंत 20 लाख युनिट्स, आर्थिक वर्ष 2021 च्या सुरूवातीस 40 लाख युनिट्स, जून 2022 पर्यंत 50 लाख युनिट्स, ऑक्टोबर 2023 पर्यंत 60 लाख युनिट्स, आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या सहामाहीत 70 लाख युनिट्स, ऑगस्ट 2025 मध्ये 80 लाख युनिट्सची विक्री आणि आता 2026 मध्ये 90 लाख युनिट्सच्या विक्रीसह, ज्युपिटरने आपली मजबूत पकड आणि वाढती लोकप्रियता सिद्ध केली आहे.






