TVS NTorq 150 (Photo Credit- x)
भारतात दरमहा मोठ्या प्रमाणात दुचाकींची विक्री होते, ज्यात स्कूटर सेगमेंटचा मोठा वाटा आहे. याच सेगमेंटमध्ये आता टीव्हीएस मोटरने आपला नवा पर्याय म्हणून TVS NTorq 150 लाँच केला आहे. हा स्कूटर 150 सीसी सेगमेंटमध्ये दाखल झाला आहे, ज्यामुळे स्पर्धा आणखी वाढली आहे.
टीव्हीएसने अधिकृतपणे भारतात NTorq 150 स्कूटर लाँच केला आहे. कंपनीने या स्कूटरला दमदार इंजिन आणि अनेक आधुनिक फीचर्ससह बाजारात आणले आहे, जे तरुण ग्राहकांना आकर्षित करतील.
New TVS Ntorq 150 launched pic.twitter.com/uNT7ZkWMjo
— RushLane (@rushlane) September 4, 2025
TVS NTorq 150 अनेक उत्कृष्ट फीचर्ससह येतो, ज्यात खालील बाबींचा समावेश आहे:
या स्कूटरमध्ये 149.7 सीसी क्षमतेचे सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 9.7 किलोवॅटची शक्ती आणि 14.2 न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करते. या दमदार इंजिनमुळे स्कूटर 6.3 सेकंदांत 0-60 किमी प्रति तास इतका वेग पकडू शकते.
कंपनीने हा स्कूटर दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे: TVS NTorq 150 आणि TVS NTorq 150 TFT. बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1.19 लाख रुपये आहे.
टीव्हीएस NTorq 150 ला 150 सीसी सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे, याची थेट स्पर्धा यामाहा एरोक्स 150 (Yamaha Aerox 150) आणि अप्रिलियाच्या 150 सीसी स्कूटरसोबत होणार आहे. भविष्यात, याला हीरो झूम 160 (Hero Xoom 160) सोबतही स्पर्धा करावी लागेल.