फोटो सौजन्य: Gemini
पूर्वी बाईक खरेदी करताना फक्त त्याच्या किंमत आणि मायलेजकडे ग्राहक जास्त लक्ष देत असत. मात्र, आजचा ग्राहक हा बाईक खरेदी करताना त्याच्या लूककडे सुद्धा फार लक्ष देऊन असतो. ग्राहकांची हीच बाब लक्षात घेत अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये दमदार आणि स्टायलिश बाईक ऑफर करत असतात. अशीच एक बाईक म्हणजे TVS Ronin.
जर तुम्ही TVS Ronin खरेदी करण्याची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे GST मध्ये झालेल्या बदलांमुळे ही बाईक स्वस्त झाली आहे.
वस्तू आणि सेवा करात म्हणजेच GST मध्ये अलिकडेच झालेल्या बदलांचा थेट परिणाम दुचाकी बाजारावर होत आहे. कंपन्या त्यांच्या बाईक आणि स्कूटरच्या किमती सातत्याने कमी करत आहेत. नवीन बाईक खरेदी करण्यासाठी बऱ्याच काळापासून वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक मोठा दिलासा आहे. टीव्हीएसने त्यांच्या लोकप्रिय बाईक, Ronin च्या किमतीत लक्षणीय कपात करण्याची घोषणा केली आहे.
तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली TVS Ronin ही 225.9cc इंजिन असलेली बाईक आहे. इंजिन क्षमता 350cc पेक्षा कमी असल्यामुळे ही बाईक नव्या GST स्लॅबमध्ये येते. परिणामी, याच्या किंमतीत तब्बल 14,000 रुपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे. कंपनी ही बाईक एकूण 6 व्हेरिएंट्समध्ये सादर करते, ज्यांच्या किंमतीत वेगवेगळी घट झाली आहे.
Lightning Black: आधी ₹1,35,990, आता ₹1,24,790 (कपात ₹11,200)
Magma Red: आधी ₹1,38,520, आता ₹1,27,090 (कपात ₹11,430)
Glacier Silver: आधी ₹1,60,510, आता ₹1,47,290 (कपात ₹13,220)
Charcoal Ember: आधी ₹1,62,010, आता ₹1,48,590 (कपात ₹13,420)
Nimbus Grey: आधी ₹1,73,720, आता ₹1,59,390 (कपात ₹14,330)
Midnight Blue: आधी ₹1,73,720, आता ₹1,59,390 (कपात ₹14,330)
GST कमी झाला अन् Toyota Fortuner चा ‘हा’ व्हेरिएंट एका झटक्यात 3 लाख रुपयांनी स्वस्त झाला
किंमतीत झालेल्या कपातीचा सर्वात मोठा फायदा त्या तरुणांना होणार आहे जे स्टायलिश आणि पॉवरफुल बाईकच्या शोधात आहेत. TVS Ronin आधीपासूनच तरुणांमध्ये लोकप्रिय आहे आणि आता किंमत कमी झाल्याने तिची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कंपनीने ही बाईक अशा डिझाईन आणि फीचर्ससह सादर केली आहे जी शहरातील राइडिंगपासून लाँग ड्राइव्हपर्यंत आरामदायी ठरते.
एकंदरीत, GST मधील कपातीचा थेट फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचला आहे. TVS Ronin आता अधिक परवडणारी झाली असून ₹14,000 पर्यंतची बचत तिला तिच्या सेगमेंटमध्ये अधिक आकर्षक बनवते. येत्या दिवसांत या बाईकच्या विक्रीत चांगली वाढ होण्याची अपेक्षा आहे.