फोटो सौजन्य: @lotienetodo (X.com)
भारतात बाईक सेगमेंटमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. बजेट फ्रेंडली बाईक्सना सर्वाधिक मागणी असली, तरी स्पोर्ट बाईक्सची क्रेझ आजही कायम आहे. विशेषतः तरुण पिढीमध्ये स्पोर्ट बाईक असणे हे अभिमानाचं समजलं जातं. त्यांच्या या आकर्षणामुळेच भारतात स्पोर्ट बाईक्सला एक खास बाजारपेठ निर्माण झाली आहे. याच मागणीचा फायदा घेत अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशी कंपन्या आपापल्या नव्या स्पोर्ट बाईक्स लाँच करत आहेत. कावासाकी ही त्यातील एक लोकप्रिय जपानी बाईक निर्माता कंपनी असून तिच्या स्टायलिश, दमदार आणि वेगवान बाईक्ससाठी ती प्रसिद्ध आहे.
ऑटो बाजारात कावासाकीच्या बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. आता तर कंपनी आपल्या एका बाईकवर दमदार ऑफर देत आहे. ही ऑफर जूनपर्यंतच मर्यादित असणार आहे.
सरकार, कंपनी की डीलर, एक कार किंवा बाईक खरेदी केल्यास कोणच्या खिशात जातात जास्त पैसे?
जर तुम्ही येत्या काही दिवसांत नवीन स्पोर्ट्स बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक ही आनंदाची बातमी ठरणार आहे. खरं तर, कावासाकी जून 2025 मध्ये त्यांच्या लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक Ninja 650 वर बंपर डिस्काउंट देत आहे. या जूनच्या महिन्यात, ग्राहक कावासाकी Ninja 650 खरेदी करून 25000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. डिस्काउंटबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहक त्यांच्या जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधू शकतात. कावासाकी निन्जा 650 चे फीचर्स, पॉवरट्रेन आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.
जर आपण या बाईकच्या पॉवरट्रेनबद्दल बोललो तर, कावासाकी निन्जा 650 मध्ये 649 सीसी, पॅरलल ट्विन, लिक्विड कूल्ड इंजिन आहे, जे 8,000 आरपीएमवर 67 बीएचपीची कमाल पॉवर आणि 6,700 आरपीएमवर 64 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. भारतीय बाजारात कावासाकी निन्जा ६५० ची एक्स-शोरूम किंमत 7.27 लाख रुपये आहे.
फक्त 9999 रुपयात Maruti Suzuki Grand Vitara होईल तुमची, कंपनीने आणली ‘ही’ स्कीम
ही बाईक स्टीलच्या ट्रेलिस फ्रेमभोवती बांधली आहे. ज्याचे वजन 196 किलो (कर्ब) आहे. यात 17-इंच अलॉय व्हील्ससह 41 मिमी टेलिस्कोपिक फोर्क्स आणि प्रीलोड-अॅडजस्टेबल मोनोशॉक आहेत. बाईकच्या पुढच्या बाजूला 300 मिमी ड्युअल डिस्क ब्रेक आणि मागील बाजूला 220 मिमी रोटर्स आहेत. बाजारात कावासाकी निन्जा 650 ची सर्वात जवळची स्पर्धक ट्रायम्फ डेटोना 660 आहे.