फोटो सौजन्य: @volkswagenindia (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केट हे नेहमीच विदेशातील ऑटो कंपन्याना खुणावत असते. म्हणूनच तर देशात विविध ऑटो ब्रॅण्ड्सच्या कार्स पाहायला मिळतात. यातही अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या भारतीय ग्राहकांच्या मागणी आणि आवडीनुसार बेस्ट कार ऑफर करतात. यातीलच एक विदेशी कंपनी Volkswagen.
नुकतेच फोक्सवॅगन इंडियाने 5 मे 2025 रोजी भारतात त्यांच्या लोकप्रिय परफॉर्मन्स हॅचबॅक फोक्सवॅगन गोल्फ जीटीआयचे बुकिंग सुरू केले आहे. लाँच झाल्यानंतर अवघ्या 5 दिवसांतच त्यांची पहिली बॅच पूर्णपणे बुक झाली आहे. कंपनीने सुरुवातीला भारतात 150 युनिट्सचा पहिला स्लॉट उघडला, जो आता पूर्णपणे विकला गेला आहे.
Honda कडून भारतात पहिल्यांदाच E-क्लच टेक्नॉलजीने सुसज्ज असणारी बाईक लाँच, मात्र किंमत खिसा कापणारी
परंतु, कंपनीने यापूर्वी माहिती दिली होती की एकूण 250 युनिट्स भारतात आयात केले जातील. या कारच्या किमतीची अधिकृत घोषणा मे 2025 मध्येच होण्याची शक्यता आहे. या कारच्या इतक्या फास्ट बुकिंगमुळे, भारतीय मार्केटमध्ये स्पोर्ट्स कार सेगमेंटबद्दल उत्साह खूप वाढला आहे हे स्पष्ट होत आहे.
फोक्सवॅगन गोल्फ जीटीआयची केबिन पूर्णपणे स्पोर्टी आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. यात GTI बॅजिंगसह लेदर-रॅप्ड स्पोर्ट्स स्टीअरिंग व्हील, पॅडल शिफ्टर्स, 12.9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10.25-इंच डिजिटल कॉकपिट प्रो (ड्रायव्हर डिस्प्ले) आहे. याशिवाय, कारमध्ये 7-स्पीकर साउंड सिस्टम, वायरलेस चार्जिंग, अँबियंट लाइटिंग आणि पॅनोरॅमिक सनरूफ सारख्या प्रीमियम फीचर्सचा समावेश आहे. या सर्व फीचर्ससह, ही कार एक उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देते.
May 2025 मध्ये Nissan च्या ‘या’ कारवर मिळतोय ताबडतोड डिस्काउंट, ही संधी गमावू नका
त्याच वेळी, जर आपण या कारच्या एक्सटिरिअर बद्दल बोललो तर, फोक्सवॅगन गोल्फ जीटीआयचे डिझाइन पूर्णपणे परफॉर्मन्स -थीमवर आधारित आहे. पुढच्या बंपरमध्ये हनीकॉम्ब पॅटर्नसह एक मोठा एअर डॅम आणि एक्स-आकाराचे फॉग लाईट्स आहेत, जे त्याला अधिक चांगले लूक देतात. साइड प्रोफाइलमध्ये GTI बॅजिंगसह लाल पट्टी आहे, जी हेडलॅम्प आणि ब्रेक कॅलिपरला जोडते आणि 18-इंच अलॉय व्हील्स आहेत, जे ते आणखी आकर्षक बनवतात. मागील बाजूस, स्मोक्ड एलईडी टेल लाईट्स, रूफ स्पॉयलर आणि ट्विन एक्झॉस्ट टिप्स तिला परफॉर्मन्स कारचा क्लासिक आणि स्पोर्टी फिनिश देतात.
परफॉर्मन्सच्या बाबतीत, गोल्फ जीटीआय इंडिया-स्पेक व्हर्जनमध्ये 2-लिटर टीएसआय टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे, जे 265 बीएचपीची जास्तीतजास्त पॉवर आणि 360 एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की ही कार फक्त 5.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते, ज्यामुळे ती भारतातील सर्वात वेगवान परफॉर्मन्स देणाऱ्या हॅचबॅकपैकी एक बनते.