फोटो सौजन्य: @bike_newsjp (X.com)
देशात बाईकची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. भारतीय मार्केटमध्ये अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या विविध सेगमेंट बाईक ऑफर करतात. यात बजेट फ्रेंडली बाईक्सना दमदार मागणी पाहायला मिळते. Honda ने देखील मार्केटमध्ये बजेट फ्रेंडली बाईक ऑफर केल्या आहेत. ग्राहकांना उत्तम टेक्नॉलॉजी मिळावी असा कंपनीचा नेहमीच प्रयत्न असतो. आता तर कंपनीने देशातील पाहिली E-क्लच टेक्नॉलजीने सुसज्ज असणारी बाईक लाँच केली आहे.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने त्यांच्या बहुप्रतिक्षित 2025 CB650R आणि CBR650R बाईक्स भारतात लाँच केल्या आहेत. या बाईक ई-क्लच टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेल्या देशातील पहिल्या बाईक्स बनल्या आहेत.
खरंतर, या बाईक्सची बुकिंग होंडाच्या बिगविंग डीलरशिप आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सुरू झाली आहे, तर याची डिलिव्हरी मे 2025 च्या अखेरीस सुरू होईल.
May 2025 मध्ये Nissan च्या ‘या’ कारवर मिळतोय ताबडतोड डिस्काउंट, ही संधी गमावू नका
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, CB650R ची एक्स-शोरूम किंमत 9.60 लाख रुपये आणि CBR650R ची 10.40 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या बाईक्समध्ये 649 सीसी इनलाइन 4-सिलेंडर इंजिन आहे, जे 70 बीएचपी पॉवर आणि 63 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे, जे होंडाच्या ई-क्लच टेक्नॉलजीने सुसज्ज आहे. या तंत्रज्ञानामुळे गिअर शिफ्टिंग अत्यंत सुरळीत आणि सोपे होते, मॅन्युअल क्लचची गरज कमी होते, शहरातील वाहतुकीत रायडिंग आरामदायी होते आणि स्पोर्टी रायडर्सना चांगले नियंत्रण आणि परफॉर्मन्स मिळते.
डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, CB650R हे निओ स्पोर्ट्स कॅफे थीमवर डिझाइन केले आहे, ज्यामध्ये एक स्कल्प्टेड फ्युएल टॅंक, गोल एलईडी हेडलॅम्प आणि एक्सपोज्ड स्टील फ्रेम आहे. त्याच वेळी, CBR650R ला फुल-फेअर आणि एरोडायनामिक स्टाइलसह रेसिंग लूक देण्यात आला आहे. दोन्ही बाईक्समध्ये 5.0-इंचाचा TFT डिस्प्ले, रेस-इंस्पायर्ड बॉडी स्टाइलिंग, एलईडी हेडलाइट्स आणि इंडिकेटर्स सारखी फीचर्स आहेत. कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाले तर, CB650R दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे – कँडी क्रोमोस्फीअर रेड आणि मॅट गनपाउडर ब्लॅक मेटॅलिक. तर CBR650R ग्रँड प्रिक्स रेड आणि मॅट गनपाउडर ब्लॅक मेटॅलिक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
जर तुम्ही परफॉर्मन्स आणि फीचर्सने समृद्ध अशी बाईक शोधत असाल, तर होंडा मॉडेल्स 2025 CB650R आणि CBR650R तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात.