फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्री नेहमीच विदेशातील ऑटो कंपन्यांना खुणावत असते. त्यात भारतात दिवसेंदिवस वाहनांची मागणी वाढताना दिसत आहे. याच मागणीकडे एक संधी पाहून अनेक ऑटो कंपन्या बेस्ट परफॉर्मन्स आणि फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत असतात. येत्या जून 2025 मध्ये देखील दमदार कार्स लाँच होण्याच्या मार्गावर आहे. चला या कार्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
टाटा हॅरियर ईव्ही पहिल्यांदा 2025 च्या भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये दाखवण्यात आली होती. आता ही कार जूनमध्ये लाँच होण्यासाठी सज्ज झाली आहे. याचे डिझाइन सध्याच्या ICE हॅरियरसारखेच असेल. पॉवरट्रेनचे डिटेल्स अद्याप कंपनीकडून गुप्त ठेवण्यात आले आहेत, परंतु असा अंदाज आहे की त्यात ड्युअल मोटर सेटअप आणि सुमारे 500 किमीची रियाल वर्ल्ड रेंज असू शकते. त्याचे लाँच मिड रेंज ईव्ही SUV सेगमेंटमध्ये मोठा बदल घडवून आणू शकते.
मर्सिडीज-बेंझ इंडिया 12 जून 2025 रोजी AMG G 63 चे स्पेशल कलेक्टर एडिशन लाँच करणार आहे. ही कार लिमिटेड युनिट्समध्ये उपलब्ध असेल आणि त्यातील खास स्टायलिंग घटकांमुळे ती आणखी खास होईल. जरी त्याची किंमत स्टॅंडर्ड व्हर्जनपेक्षा जास्त असले तरी, ही एसयूव्ही लक्झरी आणि पॉवरचे परिपूर्ण कॉम्बिनेशन असेल.
फुल्ल चार्जवर 170 km ची रेंज देणाऱ्या Honda च्या इलेक्ट्रिक बाईकची सगळीकडेच चर्चा
एमजी सायबरस्टर ही दोन-डोअर कन्व्हर्टिबल इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार आहे, जी तरुण आणि स्पोर्टी कार प्रेमींसाठी एक परिपूर्ण ऑप्शन ठरू शकते. ही देशातील पहिली इलेक्ट्रिक रोडस्टर असेल, जी दोन बॅटरी पॅक पर्यायांसह दिली जाईल. याचे स्टाइल, ओपन-टॉप डिझाइन आणि हाय परफॉर्मन्स बाजारात या कारला बेस्ट कार बनवते.
Audi Q5 ला जूनमध्ये मिड-सायकल फेसलिफ्ट मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये नवीन फ्रंट ग्रिल, स्लीक एलईडी हेडलॅम्प आणि चांगले इंटिरिअर अपडेट्स दिसतील. सध्या, ही कार फक्त एका इंजिन पर्यायासह येते, परंतु फेसलिफ्टमध्ये काही नवीन फीचर्स आणि चांगले तंत्रज्ञान येऊ शकते.
Jeep Cherokee चा होणार कमबॅक ! नव्या डिझाइनसह मिळणार महत्वाच्या प्रीमियम फीचर्स
बीएमडब्ल्यू 2 सिरीजला मिड-सायकल अपडेट मिळण्याची शक्यता आहे. ही आधीच जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्यात आली होती आणि आता जूनमध्ये भारतात ही कार लाँच होण्याची शक्यता आहे. याच्या एक्सटिरिअरमध्ये नवीन एलिमेंट्स, नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि पॉवरट्रेनमध्ये थोडे बदल होऊ शकतात.