महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्त्वात राज्याचा विकास झपाट्याने होत आहे. त्यांचे विचार आणि त्यांच्या कार्यप्रणालीमुळे राज्यातील साडे अकरा कोटी जनतेला एक नवी दिशा मिळाली आहे. सर्वप्रथम मी मुख्यमंत्री शिंदेजी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा देतो.
राजकीय घडामोडीनंतर माननीय मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य कॅबिनेटमध्ये मला विदर्भाचा प्रतिनिधी म्हणून स्थान दिले. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. राजकीय जीवन जगत असताना अनेक मित्र बनतात तर काही शत्रू देखील बनतात. मात्र, शिंदे साहेबांचा कठीण काळात देखील हार न मानण्याचा गुण खरंच कौतुकास्पद आहे. ते नेहमी मित्रासारखं माझ्या पाठीशी उभे राहतात. इतकेच नाही तर त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी दिली. मी त्यांचा विश्वास संपादन करू शकलो. हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी संधी आहे. मी फक्त राज्याच्या विकासासाठी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कॅबिनेटचा सहयोगी म्हणून काम करणार नाही तर एक मित्र म्हणून त्यांच्या प्रवासातील एक हिस्सा बनण्यामध्ये मला अत्यंत आनंद आहे.
माझ्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मी या विभागाला मजबूत करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. अन्न आणि औषध प्रशासन या नावातच दोन विषयांचा उल्लेख आहे. या दोन्ही विषयांत सर्वसामान्य जनता दैनंदिन जीवनाशी जोडली गेली आहे. हा विभाग आपली जबाबदारी विशेषरित्या पार पाडत आहे.
दुधात होणारी भेसळ थांबवण्यासाठी आणि आवश्यक औषधांचा वेळेवर पुरवठा व्हावा आणि आवश्यक वस्तूंचा काळाबाजार होऊ नये यासाठी विभाग सतर्क आहे. अन्न निरीक्षणासाठी आवश्यक प्रयोगशाळांची संख्या अपुरी आहे. उपकरण आणि टेक्नॉलॉजी जुन्या आहेत. त्यासाठी राज्यात तीन प्रयोगशाळांच्या आधुनिकीकरणासाठी 3 कोटी रुपयांची तातडीची मागणी केली गेली होती. मुख्यमंत्र्यांनी यावर तातडीने निर्णय घेतला आणि त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली.
– संजय राठोड, अन्न व औषध प्रशासन मंत्री