• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • The Storm Of Pink Cloth Is Coming Nrdm

गुलाबी गमछ्याचील वादळ येतंय !

महराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभांच्या आगामी निवडणुकांत ही तेलुगू मोटारगाडी कुणाकुणाला शर्यतीत हरवते की, अर्ध्या रस्त्यावरचं बंद पडते, हे दिसणार आहे. मात्र निवडणुका ताकदीने लढण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला असून, त्यांचा ताजा पंढरपूर दौरा हाही त्याचं दिशेने टाकलेले दमदार पाऊल होते. आषाढी वारीची वेळ निवडून त्यांनी राजकीय चतुराई देखील दाखवली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 02, 2023 | 06:00 AM
गुलाबी गमछ्याचील वादळ येतंय !
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
विंदा करंदिकरांची क्षमा मागून एक गाणं सध्या राजकीय वर्तुळात गुणगुणले जाते आहे.
‘गुलाबी धूळ उडते आज,
तिकडून येईल एक ‘मोटारस्वार’,
तुझ्या दगडावर लावील धार, इतके यश तुला रगड,
माझ्या मनाबन दगड ! ‘
महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांना सर्व नेत्यांना एक तगडं आव्हान उभे राहते आहे. गुलाबी फेटा डोक्यावर, गुलाबी गमछा गळ्याभोवती आणि मोटरगाडी हे निवडणूक चिन्ह घेऊन कलवाकुंतल चंद्रशेखर राव हे ६९ वर्षांचे ‘तरुण’ गृहस्थ सध्या दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या राजकारणावर आक्रमण करत आहेत. मोदींच्या आणि त्यांच्या राजकीय शिखर कारकीर्दीला जवळपास तितकाच काळ लोटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ मध्येच देशाच्या राजकीय क्षितिजावर प्रथम चमकले. तोवर आधीचा एक तपाचा कालखंड त्यांनी गुजरातचे नेतृत्व करण्यात घालवला होता. पण भारतीय जनता पक्षाचा एकमेव आशेचा किरण बनून मोदी जे राजधानी दिल्लीत दाखल झाले ते थेट देशाचा एक ठळक राजकीय धृवताराच बनून गेले. आज देशाचे सारे राजकारण त्यांच्याच भोवती फिरते आहे. नेमके तेच स्थान के. चंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांनी तेलंगणा राज्यात राखले आहे.
तेलंगणा राज्याच्या स्थापनेनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती या केसीआर यांच्या पक्षाने विधानसभेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. तोच निकाल त्यांनी २०१८ च्या दुसऱ्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत कायम राखला. ७० टक्के जागा पादाक्रांत करून तेलंगणाचे एकमेव मोठे नेते हा बुहमान त्यांनी मिळवला. आता गेल्या वर्षभरात त्यांनी तेलंगणाप्रमाणेच अन्य राज्यात वर्चस्व स्थापन करता येते का याकडे लक्ष पुरवले आहे. त्यांनी पक्षाचे नाव बदलले असून ते भारत राष्ट्र समिती या नावाने उभे राहात आहेत.
तेलंगणात त्यांना मोटारगाडी हे निवडणूक चिन्ह मिळाले, तेच त्यांना अन्य राज्यांतील निवडणुकांमध्ये ठेवता येते. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभांच्या आगामी निवडणुकांत ही तेलगु मोटारगाडी कुणाकुणाला शर्यतीत हरवते की, अर्ध्या रस्त्यातच बंद पडते हे दिसणार आहे. मात्र, निवडणुका ताकदीने लढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला असून त्यांचा ताजा पंढरपूर दौरा हाही त्याच दिशेने टाकलेले दमदार पाऊल होते. आषाढी वारीची वेळ निवडून त्यांनी राजकीय चतुराईदेखील दाखवलेली आहे. वारी हा महाराष्ट्राच्या ग्रामीण व शेतकरी समाजाचा फार मोठा उत्सव असतो. महाराष्ट्राच्या सर्व विभागांतून सर्व जिल्ह्यांमधून शेतकरी वारकऱ्यांच्या दिंड्या आषाढी एकादशीचा मुहूर्त गाठण्यासाठी पंढरपुरात जमतात. तिथले दैवत विठ्ठल- रखुमाई हे विष्णू- लक्ष्मीचे अवतार आहेत, असे भागवत संप्रदाय मानतो. विठ्ठल हा कानडा आहे म्हणजेच दक्षिणेशी त्याचे मूळ जुळले आहे अशी वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे. दक्षिणेतून उगवलेल्या पक्षाने महाराष्ट्रात जनाधार शोधण्यासाठी वारीचा मुहूर्त गाठावा हेही लक्षणीय ठरते.
पंढरपूर जवळच केसीआर यांनी एक दणदणित सभाही घेतली. तिथे दर्शनासाठी त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि संपूर्ण विधिमंडळ पक्ष नेला होता. ६०० गाड्यांचा ताफा धुरळा उडवत हैद्राबादेतून आला होता आणि त्यांनी वारीच्या दोन-तीन दिवस आधी दर्शन घेतले व सभाही केली. या सभेत केसीआर यांचा भर राहिला तो अर्थातच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर.
तेलंगणात ज्या सवलती शेतकऱ्यांना दिल्या जातात त्या महाराष्ट्रात द्यायच्या तर राज्याचे दिवाळे वाजेल, अशी टिका काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्याला अनुलक्षून केसीआर बरसले की, महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वात श्रीमंत राज्य आहे. इथल्या सरकारने इतक्या वर्षात शेतकऱ्यांसाठी फार काहीच केले नाही. माझ्याप्रमाणे योजना इथे राबवणे काय अवघड आहे ? जे तेलंगणाला करता आले ते महाराष्ट्रात नक्कीच करता येईल. पण भीती इथल्या नेत्यांना वाटते आहे. ते कंगाल होतील आणि इथला शेतकरी श्रीमंत होईल, अशा योजना आम्हाला राबवायच्या आहेत. केसीआर यांचा नाराचा आहे की ‘अबकी बार शेतकरी सरकार!’ केसीआर यांच्या महाराष्ट्रातील दौरे आणि सभांनी राजकारणात मोठी खळबळ नक्कीच माजवलेली आहे.
त्यांनी अलिकडे दोन-चार मोठ्या सभा घेतल्या. हे जरी खरे असले तरी त्यांनी महाराष्ट्रात घुसण्याची तयारी वर्षभरापूर्वीपासून सुरु केलेली आहे.
माणिक कदम हे परभणीचे शेतकरी नेते सध्या केसीआर यांच्या पक्षाचे महाराष्ट्र शेतकरी सेलचे प्रमुख आहेत. ते आधी राजू शेट्टींच्या स्वाभिमान शेतकरी संघटनेचे मोठे नेते होते. त्यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांचे प्रश्न केसीआर सरकारने कसे सोडवले, याचा अभ्यास केला होता आणि त्यावर ते राज्यात बोलतही होते. त्यांचे एका टीव्ही चॅनेलवरील भाष्य केसीआर यांच्यापर्यंत पोचले. तेव्हा त्यांनी माणिकरावांना हैद्राबाद भेटीचे निमंत्रण दिले. माणिकराव सांगतात की, तेलंगणात रयतु बंधु या योजनेखाली शेतकऱ्यांना दरसाल ठराविक मदत दिली जाते. त्यांच्या शेतीला पाणी आणि कृषीपंपांसाठी वीज चोवीस तास उपलब्ध केली जाते. त्यामुळे तेलंगणात एकही शेतकरी आत्महत्या करत नाही आणि महाराष्ट्रात दरसाल शेकडो शेतकऱ्यांना कीटककाशके पिऊन वा फाशी घेऊन जीवनयात्रा संपवावी लागते हे केव्हढे दुर्दैवी आहे. पण आपल्या राज्यकर्त्यांना मग ते कोणत्याही पक्षाचे का असेनात त्यांना शेतीचे प्रश्न सोडवताच आलेले नाहीत. तेलंगणात केसीआर सरकाने रखडलेला धरणप्रकल्प अवघ्या काही वर्षातच पुरा करून दाखवला आणि लगतच्या मराठवाड्यातील शेतकरी भारावून गेला, असे कदम म्हणतात.
राजु शेट्टी म्हणतात की, ‘सबका साथ सबका विश्वास’ या घोषणेवर आपण मागच्या वेळी भुललो होतो. पण मोदींच्या राजवटीतही शेतकरी सुखावलेला नाही. आता केसीआर खरोखरीच शेती आणि शेतकऱ्यासाठी काही चंगले काम करणार असतील तर विचार करावा लागेल. राजकीय क्षितिजावरचे दुसऱ्या तिसऱ्या फळीतील महत्वाचे नेते केसीआर यांच्या झेंड्याखाली एकत्र येत आहेत व ही बाब सर्वच राजकीय नेत्यांना चिंतेची वाटू लागली आहे.
परवाच भगिरथ भालके पंढरपूरच्या सभेत केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीत दाखल झाले. हे सर्वात ताजे शिलेदार. या आधी माजी खासदार हरिभाऊ राठोड हे काँग्रेसचे, तर भारतीय जनता पक्षांचे मागील काळातली आमदार राहिलेले नागपूरचे चरण वाघमारे आणि यवतमाळचे राजू तोडसाम हे सध्या केसीआर यांच्या पंखाखाली गेले आहेत. असंख्य कार्यकर्ते तिकडे दाखल झाले आहेत. त्यामुळे गावोगावी बीआरएसचे बॅनर पोस्टर झळकू लागले आहेत. भारत भालके हे पंढरपूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार यांचे करोनात निधन झाले तेव्हा राष्ट्रवादीने त्यांचे पुत्र भालके यांना पोटनिवडणुकीत उतरवले होते. पण ते पराभूत झाले. आता ते बीआरएसकडे गेले आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडीचे नेते सावध झाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान बीआरएस महाराष्ट्रात करु शकेल असे दिसते. काँग्रेसने बीआरएसला आपल्या प्रमुख शत्रुंच्या यादीत टाकले आहे.
२०२३च्या अखेरीकडे देशात ज्या विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत त्यात तेलंगणाचाही समावेश आहे. तिथे ११९ सदस्यांच्या विधानसभेत टीआरएसचे १०३ आमदार सध्या आहेत. काँग्रेसला २०१८ च्या निवडणुकीत पंधरा जागा लाभल्या होत्या. पण त्यातील दहा केसीआरकडे पळाले होते व सध्या काँग्रेसचे पाच भाजपचे दोन आणि एमआयएमचा एखादा इतकेच विरोधी आमदार तिथल्या विधानसभेत दिसतात. हे चित्र २०२३ च्या निवडणुकीत पालटेल असा विश्वास काँग्रेसला वाटतो. कर्नाटकात जसा भाजपचा पराभव केला तसाच पराभव तेलंगणात केसीआरचा करू, अशा वल्गना काँग्रेसचे स्थानिक नेते करत आहेत. महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्यासाठी केसीआर यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवले आहे. याच कारणामुळे केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाकडून ‘अबकी बार शेतकरी सरकार’ असा प्रचार केला जात आहे. विदर्भ आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार व्हावा यासाठी केसीआर विशेष प्रयत्न करत आहेत. ते महाराष्ट्रात ‘तेलंगणा मॉडेल’ राबवू पाहात आहेत.
महाराष्ट्रातील ४५ हजार गावांमध्ये पक्षाचे जाळे निर्माण करण्यासाठी केसीआर यांनी साधारण महिन्याभराचा कार्यक्रम जाहीर केला आहे. के. चंद्रशेखर राव यांच्या या दौऱ्यावर भाजप, शिवसेना (शिंदे गट), तसेच महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप आणि शिंदे गटाने केसीआर यांचे स्वागत केले आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केसीआर यांच्या पक्षविस्ताराच्या मोहिमेवर टीका केली आहे. काँग्रेसने अलिकडेच दिल्लीत पक्ष प्रवेशाचा मोठा कार्यक्रम केला आणि केसीआर यांच्या ३५ माजी खासदार- आमदारांना काँग्रेसमध्ये दाखल करून घेतले. भाजपातही केसीआरवर चिडून बाहेर पडेलेले माजी मंत्री कार्यरत आहेत. त्या सर्वांच्या प्रभावाने केसीआर यांच्याकडे नक्कीच घटतील. पण सत्ता मात्र बीआरएसच्याच हाती राहील. तसे झाले तर २०२४ ला ते अधिक जोर लावणार यात शंका नाही.
– aniketsjoshi@hotmail.com
– अनिकेत जोशी

Web Title: The storm of pink cloth is coming nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • BJP
  • BRS)
  • Telangana

संबंधित बातम्या

आगामी निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी; चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन
1

आगामी निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी; चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

राजकीय घडामोडींना वेग, स्थानिक निवडणुकांसाठी भाजपची खलबते; बैठकीत नेमकं काय चर्चा झाली?
2

राजकीय घडामोडींना वेग, स्थानिक निवडणुकांसाठी भाजपची खलबते; बैठकीत नेमकं काय चर्चा झाली?

शरद लाड यांना भिडणार नवा पैलवान; पुणे पदवीधर निवडणुकीसाठी शरद पवारांनी शोधला पर्याय
3

शरद लाड यांना भिडणार नवा पैलवान; पुणे पदवीधर निवडणुकीसाठी शरद पवारांनी शोधला पर्याय

Bihar Politics: ‘एनडीए’ला हरवण्याची स्वप्न पाहणारे महागठबंधनच मोडकळीस? पक्ष एकत्र मात्र… ; विषय काय?
4

Bihar Politics: ‘एनडीए’ला हरवण्याची स्वप्न पाहणारे महागठबंधनच मोडकळीस? पक्ष एकत्र मात्र… ; विषय काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘दिसायला सुंदर पण डोक्यात भरलाय भुसा’, शोएब अख्तरने उडवली प्रसिद्ध अभिनेत्रीची खिल्ली, पाहाल तर हसूच आवरणार नाही; Video Viral

‘दिसायला सुंदर पण डोक्यात भरलाय भुसा’, शोएब अख्तरने उडवली प्रसिद्ध अभिनेत्रीची खिल्ली, पाहाल तर हसूच आवरणार नाही; Video Viral

Oct 22, 2025 | 09:07 AM
रक्तवाहिन्या ब्लॉक का होतात? सकाळी फॉलो केलेल्या ‘या’ चुकीच्या सवयींमुळे वाढतो हार्ट अटॅकचा धोका, वेळीच करा बदल

रक्तवाहिन्या ब्लॉक का होतात? सकाळी फॉलो केलेल्या ‘या’ चुकीच्या सवयींमुळे वाढतो हार्ट अटॅकचा धोका, वेळीच करा बदल

Oct 22, 2025 | 09:03 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किमतीत आज पुन्हा बदल, चांदीचे भाव घसरले! दर पाहूनच घ्या पुढचा निर्णय

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किमतीत आज पुन्हा बदल, चांदीचे भाव घसरले! दर पाहूनच घ्या पुढचा निर्णय

Oct 22, 2025 | 08:57 AM
करोडो iPhone यूजर्ससाठी लवकरच येतंय हे जबरदस्त फीचर, Liquid Glass वर मिळणार आता संपूर्ण कंट्रोल! युजर्ससाठी ठरणार फायदेशीर

करोडो iPhone यूजर्ससाठी लवकरच येतंय हे जबरदस्त फीचर, Liquid Glass वर मिळणार आता संपूर्ण कंट्रोल! युजर्ससाठी ठरणार फायदेशीर

Oct 22, 2025 | 08:36 AM
Numerology: पाडव्याच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल अधिक फायदा, वैवाहिक जीवनात मिळेल यश

Numerology: पाडव्याच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल अधिक फायदा, वैवाहिक जीवनात मिळेल यश

Oct 22, 2025 | 08:36 AM
भारतात या ठिकाणी वाहतात 17 नद्या, शांततेच वातावरण अनुभवायचं असेल तर नद्यांच्या शहरांना जरूर भेट द्या

भारतात या ठिकाणी वाहतात 17 नद्या, शांततेच वातावरण अनुभवायचं असेल तर नद्यांच्या शहरांना जरूर भेट द्या

Oct 22, 2025 | 08:30 AM
Top Marathi News Today Live : नायजेरियात पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकरचा मोठा स्फोट; 31 जणांचा मृत्यू

LIVE
Top Marathi News Today Live : नायजेरियात पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकरचा मोठा स्फोट; 31 जणांचा मृत्यू

Oct 22, 2025 | 08:25 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : प्रभाग रचनेवरुन अहिल्यानगरमध्ये राजकारण तापणार? ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Ahilyanagar : प्रभाग रचनेवरुन अहिल्यानगरमध्ये राजकारण तापणार? ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Oct 21, 2025 | 08:01 PM
Ahilyanagar : खोटा रिपोर्ट बनवून चुकीचा उपचार केल्याने डॉक्टरांना जामीन नाकारला; आरोपींना तात्काळ अटक करण्याची नागरिकांची मागणी

Ahilyanagar : खोटा रिपोर्ट बनवून चुकीचा उपचार केल्याने डॉक्टरांना जामीन नाकारला; आरोपींना तात्काळ अटक करण्याची नागरिकांची मागणी

Oct 21, 2025 | 07:50 PM
Kalyan : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचा KDMC मुख्यालयासमोर बोनससाठी आंदोलन

Kalyan : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचा KDMC मुख्यालयासमोर बोनससाठी आंदोलन

Oct 21, 2025 | 05:55 PM
Ahilyanagar : IMA चा आक्षेप; त्या 6 डॉक्टरांवरील ‘जाचक’ कलमे वगळण्याची केली पोलिसांकडे मागणी

Ahilyanagar : IMA चा आक्षेप; त्या 6 डॉक्टरांवरील ‘जाचक’ कलमे वगळण्याची केली पोलिसांकडे मागणी

Oct 21, 2025 | 05:47 PM
Bhiwandi : भिवंडीत रस्त्यांच्या दुरावस्थेवर नागरिकांचा निषेध; मानसरोमध्ये काळी दिवाळी साजरी

Bhiwandi : भिवंडीत रस्त्यांच्या दुरावस्थेवर नागरिकांचा निषेध; मानसरोमध्ये काळी दिवाळी साजरी

Oct 21, 2025 | 05:32 PM
Nashik : दिवाळीत झेंडू फुलांचे भाव अपेक्षेपेक्षा कमी; शेतकऱ्यांना आर्थिक ताण

Nashik : दिवाळीत झेंडू फुलांचे भाव अपेक्षेपेक्षा कमी; शेतकऱ्यांना आर्थिक ताण

Oct 21, 2025 | 04:58 PM
Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Oct 20, 2025 | 05:39 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.