उत्पादनांचा पुरस्कार करणाऱ्या एन्डॉर्सनी जाहिरातींमधून दिशाभूल करणारे दावे करू नयेत यासाठी एएससीआयने सुरू केली आहे एन्डॉर्सर ड्यू डिलिजन्स सेवा

या सशुल्क सेवेद्वारे एएससीआय आपल्या जाहिरात मूल्यमापन क्षेत्रातीलविशेषज्ञानाचा वापर करून जाहिरातीचा भाग असलेल्या तांत्रिक दाव्यांसह इतर मुद्दयांबाबत तज्ज्ञ सल्ला देऊ करेल. यासाठी एएससीआयने तज्ज्ञांचे एक पॅनल स्थापन केले असून यात जाहिरात नियमन आणि कायदा, आयुर्वेद, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, मार्केट रिसर्च, न्यूट्रिशन, डेन्टिस्ट्री, प्रोडक्ट फॉर्म्युलेशन, फायनान्शियल सर्व्हिसेस अशा २० हून अधिक ज्ञानशाखांतील तज्ज्ञांचा त्यात समावेश आहे.

  • या सेवेद्वारे २० हून अधिक ज्ञानशाखांतील उच्च विद्याविभूषित विशेषज्ज्ञांकडून मार्गदर्शन पुरविले जाईल
  • एन्डॉर्सना कायद्याने घालून दिलेले नियम पाळण्यास मदत होणार

मुंबई : जाहिरातींच्या माध्यमातून एखाद्या वस्तू वा सेवेचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्ती अर्थात या उत्पादनांच्या एन्डॉर्सना अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्डस् कौन्सिल ऑफ इडिया (ASCI)च्या आचारसंहितेचे पालन करणे सोपे जावे तसेच अशा व्यक्ती ज्या जाहिरातींमध्ये काम करणार आहेत त्या जाहिरातींची साक्षेपी पडताळणी म्हणजे ड्यू डिलिजन्स करून घेणे बंधनकारक ठरविणा-या ग्राहक संरक्षण कायद्यान्वये (२०१९) आखून देण्यात आलेले नियम पाळता यावेत यासाठी एएससीआयने एंडॉसर्स ड्यू डिलिजन्स सेवा सुरू केली आहे.

या सशुल्क सेवेद्वारे एएससीआय आपल्या जाहिरात मूल्यमापन क्षेत्रातीलविशेषज्ञानाचा वापर करून जाहिरातीचा भाग असलेल्या तांत्रिक दाव्यांसह इतर मुद्दयांबाबत तज्ज्ञ सल्ला देऊ करेल. यासाठी एएससीआयने तज्ज्ञांचे एक पॅनल स्थापन केले असून यात जाहिरात नियमन आणि कायदा, आयुर्वेद, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, मार्केट रिसर्च, न्यूट्रिशन, डेन्टिस्ट्री, प्रोडक्ट फॉर्म्युलेशन, फायनान्शियल सर्व्हिसेस अशा २० हून अधिक ज्ञानशाखांतील तज्ज्ञांचा त्यात समावेश आहे.

हे पॅनल जाहिरातींमधील प्रतिनिधीत्व, विधाने आणि दावे यांचे ग्राहकांच्या व तांत्रिक दृष्टीकोनातून मूल्यमापन करेल, आवश्यक असेल तिथे दाव्यांच्या पुष्ठ्यर्थ देण्यात आलेल्या पुराव्यांची तपासणी करेल आणि त्यायोगे एन्डॉसर्सना आपली ड्यू डिलिजन्सची प्रक्रिया पार पाडता येईल. या जाहिराती प्री-प्रोडक्शनपासून कोणत्याही टप्प्यावर एएससीआयकडे पाठवता येईल. यामुळे एन्डॉर्सना जाहीरातीची निर्मिती होण्याआधी स्वतंत्रपणे आपली ड्यू डिलिजन्सी प्रक्रिया पूर्ण करण्याची खबरदारी घेता येईल.

ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मध्ये खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये काम केल्यास अशा एन्डॉर्सना दंड ठोठावण्याची किंवा त्यांना कोणत्याही उत्पादन वा सेवेची जाहिरात करण्यापासून बंदी घालण्याची तरतूद आहे, ही बंदी वर्षभरासाठीही लांबू शकते. त्याचवेळी एन्डॉर्सरने आपण काम करत असलेल्या जाहिरातींच्या दाव्यांमधील तथ्य तपासण्यासाठी ड्यू डिलिजन्स करून घेतले असेल तर त्यांना असा दंड वा बडतर्फी माफ करण्याची तरतूदही या कायद्यामध्ये आहे.

डफ अँड फेल्प्सच्या “सेलिब्रिटी ब्रॅण्ड व्हॅल्युएशन रिपोर्ट” नुसार अमेरिकेत सुमारे २०%एन्डॉर्समेंट्समध्ये ‘सेलिब्रिटीज असतात, त्या तुलनेत भारतामध्ये हे प्रमाण सुमारे ५०% इतके आहे. भारतामध्ये २०२० च्या टॉप २० पुरस्कारकर्त्यांची एकूण ब्रॅण्ड व्हॅल्यू ही 1 बिलियन डॉलर्स इतकी असल्याचेही याच अहवालात नोंदवण्यात आले आहे. सेलेब्रिटी एन्डॉर्समेंटवरील TAM AdExअहवालात असे म्हटले आहे की, 2021मध्ये टीव्हीवर प्रदर्शित झालेल्या जाहिरातींपैकी 25% हून अधिक जाहिरातींना सेलिब्रिटींकडून एन्डॉर्स केले जाते, ज्यातील 85% जाहिरातींमध्ये चित्रपटांतील तारे-तारकांनी त्या उत्पादनाचा पुरस्कार केलेला असतो.

एएससीआयचे चेअरमन सुभाष कामत म्हणाले, “उत्पादनांचा पुरस्कार करणारे एन्डॉर्सर्स, विशेषत: सेलेब्रिटीज यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असतो, त्यामुळे लक्षावधी ग्राहकांनी त्यांच्यावर विश्वास टाकलेला असतो. आणि म्हणूनच अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींतील उत्पादनांचे प्रतिनिधित्व केले जाऊ नये याची काळजी घेणे ही सेलेब्रिटींची नैतिक आणि आता कायदेशीरही जबाबदारी आहे. आपण कोणत्या जाहिरातीचा पुरस्कार करत आहोत याबद्दल सेलेब्रिटींनी जागरुक रहावे अशी गरज एएससीआयने नेहमीच मांडली आहे, आणि आता कायद्यानेही या संदर्भात ड्यू डिलिजन्स करून घेण्याची गरज प्रतिपादित केली आहे.”

एएससीआयकडून दिल्या जात असलेल्या जाहिरात सल्ला सेवेप्रमाणेच एन्डॉर्सर्सचे ड्यू डिलिजन्स हे गोपनीय ठेवले जाते आणि एन्डॉर्सरच्या नावे जाहीर केले जात नाही.

एएससीआय सेक्रेटरी जनरल मनिषा कपूर म्हणाल्या, “आपण ज्या उत्पादनाचे समर्थन करत आहोत ते उत्पादन कोणते दावे करत आहे हे जाणून घेण्याइतकी हुशारी प्रत्येक एन्डॉर्सरकडे असतेच असे नाही. एन्डॉर्सर्स ज्या जाहिरातीत काम करतात त्या जाहिरातींतील दाव्यांसाठी ते कायद्याने उत्तरदायी ठरतात, आणि म्हणूनच एन्डॉर्सर्स ड्यू डिलिजन्स अत्यंत गरजेचे ठरते. एएससीआय सेवा ही वेगवान, गोपनीय आणि बहुशाखीय पॅनलने केलेल्या मूल्यमापनावर आधारित असल्याने एन्डॉर्सना वेळमध्ये आणि सर्व बाजूंनी ड्यू डिलिजन्सचे काम पूर्ण करता येते. यातून ग्राहकांची दिशाभूल तसेच एन्डॉर्सर्सकडूनही आपल्यावरील कायदेशीर बंधनांचे उल्लंघन होणार नाही.”

एएससीआयच्या एन्डॉर्सर ड्यू डिलिजन्स सेवेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया येथे आमच्याशी संपर्क साधा.