सॅक्रामेंटो : जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकल्या आहेत. प्रदूषणाने मोठ्या समस्या निर्माण होऊ लागल्याने ते कमी करण्यासाठी पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जगभरातले अनेक देश प्रयत्न करत आहेत. अमेरिकेतील राज्य कॅलफोर्नियात आता पेट्रोल-डिझेलवर बंदी घातली जाणार आहे. कॅलिफोर्निया राज्य सरकारने इंधनावर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घालणारे कॅलिफोर्निया सरकार हे जगातील पहिले सरकार आहे. कॅलिफोर्निया राज्य सरकारने घातलेली बंदी २०३५ पासून लागू होणार आहे.
कॅलिफोर्निया सरकारचा असा अंदाज आहे की, २०३५ पर्यंत राज्यात इलेक्ट्रिक वाहने, प्लग-इन हायब्रिड किंवा हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांची १०० टक्के विक्री होईल. हवामान बदल, प्रदूषणाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कॅलिफोर्निया सरकारने हे पाऊल उचलले आहे.