'ही' आहे अब्जाधीश अनिल अग्रवाल यांची मुलगी; 'जी' सांभाळतीये तब्बल 2,54,000 कोटींची कंपनी!
अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल हे देशातील उद्योग विश्वात “मेटल किंग” म्हणून प्रसिद्ध आहेत. ते भारतातील आघाडीचा उद्योग समुह असलेल्या वेदांत रिसोर्सेस लिमिटेडचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. मात्र, आता त्यांची मुलगी प्रिया अग्रवाल हेब्बर ही आपल्या वडिलांच्या कंपनीत आपला ठसा उमटवत आहे. प्रिया हिंदुस्तान झिंक लिमिटेड या वेदांता ग्रुपच्या कंपनीचे नेतृत्व करत आहे.
1993 मध्ये वेदांत समुहाची सुरुवात
प्रिया अग्रवाल हेब्बर यांचा जन्म उद्योजक कुटुंबात झाला. त्यांचे वडील अनिल अग्रवाल यांनी बिहारमधील पटना या ठिकाणी आपल्या उद्योगाचा पाया रचला. अनिल हे वयाच्या 19 व्या वर्षी त्यांच्या वडिलांना ॲल्युमिनियम कंडक्टर व्यवसायात मदत करण्यासाठी मुंबईला आले. मुंबईत त्यांनी 1976 मध्ये समशेर स्टारलिंग कॉर्पोरेशन ही कंपनीचे अधिग्रहण करून आपल्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात केली. ज्यामुळे 1993 मध्ये स्टरलाइट इंडस्ट्रीजच्या स्थापनेसह वेदांत समुहाची अधिकृतपणे सुरुवात झाली.
आता त्यांची मुलगी प्रिया अग्रवाल हेब्बर ही वेदांत समुहाची जबाबदारी सांभाळत आहे. प्रिया या वेदांत समुहामध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. तर प्रिया हिंदुस्तान झिंक लिमिटेड या वेदांता ग्रुपच्या कंपनीचे त्या नेतृत्व करत आहे. त्यांच्या या कंपनीचे बाजार भांडवल तब्बल 2,54,000 कोटी रुपये इतके आहे.
2013 पासून वेदांता समुहात सक्रिय
प्रियाने वॉरविक विद्यापीठातून तिचे शिक्षण पूर्ण केले असून, तिने मानसशास्त्र आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहे. यानंतर प्रियाने ओगिल्वी आणि माथरमध्ये एक वर्षाची इंटर्नशिप केली आहे. प्रियाच्या शैक्षणिक पार्श्वभूमीने तिचा व्यावसायिक दृष्टिकोन घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2013 मध्ये प्रिया ही वेदांता समुहाच्या मंडळावर बिगर कार्यकारी संचालक म्हणून रुजू झाल्या होत्या.
सामाजिक कार्यातही पुढाकार
तेव्हापासून त्यांनी कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे वेदांत समुहाला अधिक सामाजिक जबाबदार उपक्रम बनण्यास मदत झाली आहे. त्यांनी दोन प्राणी कल्याण संस्था स्थापन केल्या आहेत. तिने वॉरविक विद्यापीठात शिक्षण घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली, अनिल अग्रवाल फाउंडेशनने सुमारे 240 दशलक्ष डॉलर गुंतवणूक केली आहे.
प्रियाने तिच्या कॉर्पोरेट जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त प्राणी कल्याणासाठी मोठे काम केले आहे. त्यांनी योडा (युथ ऑर्गनायझेशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ ॲनिमल्स) आणि टॅको (ॲनिमल केअर ऑर्गनायझेशन) या संस्थांची स्थापना केली आहे. तिचे हेच काम प्रियाला कॉर्पोरेट जगतातील चार भारतीयांपैकी एक म्हणून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) 2024 यंग ग्लोबल लीडर्स क्लासमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. प्रिया अग्रवाल यांनी बिझनेसमन आकर्ष हेब्बर यांच्यासोबत आपला संसार थाटला आहे.






