सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्याच्या आडेली गावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या विहिरीचे बांधकाम मागील वर्षापासून अपूर्ण असून यावर्षीही पावसाळा तोंडावर आला असतानाही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे स्थानिकांना पहाटे इतर भागातून पाणी आणावे लागत असून काहींना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दुसरी विहीर कोरडी पडली असून शासकीय नळपाणी योजनेचे पाणीही सध्या उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न कायम असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून विहिरीचे काम तातडीने पूर्ण करून पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.