मिशेल सॅंटनरचे मुंबई इंडियन्सवर गंभीर आरोप (फोटो- सोशल मीडिया)
मिशेल सॅंटनरचे मुंबई इंडियन्सवर गंभीर आरोप
पूर्ण फी पैकी अर्धेच पैसे दिल्याचा केला आरोप
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स शेवटच्या स्थानावर
IPL 2026: आयपीएलची स्पर्धा नुकतीच पूर्ण झाली आहे. आरसीबीने 2026 ची आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मात्र यंदाच्या हंगमातव वेळेस ट्रॉफी जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये 9 व्या स्थानावर होता. मात्र आता मुंबई इंडियन्सवर न्यूझीलंडचा फिरकीपटू आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू असलेल्या मिचेल सँटनर यांच्यातील वाद समोर आला आहे. नेमका हा वाद काय आहे ते जाणून घेऊयात.
आयपीएल 2026 संपल्यानंतर आता मिचेल सँटनर आणि मुंबई इंडियन्समधील वाद निर्माण झाला आहे. मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनरने खळबळजनक आरोप केला आहे की, दुखापतीमुळे आयपीएल सोडून गेल्यानंतर त्याला त्याच्या करारातील पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही. दरम्यान आता त्याच्या आरोपाना मुंबई इंडियन्स काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे.
संसार मोडणार? Hardik Pandya च ठरलं; MI च्या संघात मोठा भूकंप; ‘त्या’ निर्णयामुळे खळबळ
नेमका वाद काय?
इंग्लंडविरुद्ध 4 जून रोजी न्यूझीलंड कसोटी सामना खेळणार आहे. त्याआधी हा वाद समोर आला आहे. मिचेल सँटनरने एका पॉडकास्टमध्ये आपली व्यथा मांडली असल्याचे समोर आले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, “आयपीएल 2026 चा हंगाम अर्धवट सोडावा लागला असल्याने मुंबई इंडियन्सने मला माझ्या ठरलेल्या पगाराच्या फक्त अर्धीच रक्कम दिली आहे. फ्रँचायझीच्या या निर्णयामुळे मी खूप निराश झालो आहे,” असे मिचेल सँटनर म्हणाला. आयपीएलच्या नियमानुसार, जर एखादा खेळाडू जखमी झाला तर त्याला पूर्ण आगर मिळणे अपेक्षित असते. सँटनरने केलेल्या आरोपामुळे बीसीसीआय आणि फ्रँचायझीच्या नियमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
MI च्या संघात मोठा भूकंप
हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सचे नाते आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. सलग दोन वर्षांचा मानसिक दबाव आणि संघातील अंतर्गत कलहामुळे हार्दिकने फ्रँचायझी सोडण्याचा विचार केला असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र अशी चर्चा सुरू असल्याचे समजते आहे.
मुंबई इंडियन्सचे नेतृत्व 2024 मध्ये हार्दिक पंड्याने स्वीकारले. हार्दिक पंड्यासाठी 2026 चा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. केवळ खराब निकाल नव्हे तर ड्रेसिंग रूममधील तणावपूर्ण वातावरण यामुळे हार्दिक पंड्या व्यथित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे समोर आलेल्या माहितीनुसार, आता बास झाले अशी भूमिका पंड्याने घेतल्याचे म्हटले जात आहे. समजा हार्दिक पंड्याने मुंबईची साथ सोडली तर तो मेगा ऑक्शनमध्ये आपले नाव नोंदवू शकतो किंवा पुन्हा एकदा त्याच्या जुन्या गुजरात टायटन्स संघाकडे परतण्याची शक्यता नाकारता येत नाही.






