छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (सीएसएमआयए) यंदा हज यात्रेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज आहे. विमानतळाला मुंबईतून सौदी अरेबियाला प्रवास करणाऱ्या ३३,००० यात्रेकरूंना निर्गमनाची सुविधा देण्याची अपेक्षा आहे. सीएसएमआयए मे २०२४ ते जुलै २०२४ पर्यंत आगमन व निर्गमनांसह ६५,००० हून अधिक प्रवाशांची हाताळणी करण्यास सज्ज आहे. या महत्त्वपूर्ण कार्यसंचालनामधून सीएसएमआयएचे भारतातील हज यात्रेसाठी प्रमुख निर्गमन स्थळ म्हणून महत्त्व दिसून येते. सीएसएमआयए टप्प्याटप्प्याने व समन्वयित दृष्टीकोनासह प्रवाशांच्या वाढत्या रहदारीचे व्यवस्थापन करण्यास पूर्णपणे सज्ज आहे.
वर्ष २०२४ मध्ये सीएसएमआयएच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या हज यात्रेकरूंच्या आकडेवारीत वार्षिक १५७ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे, तुलनेत २०२३ मध्ये विमानतळावरून १२,८१५ यात्रेकरूंनी प्रवास केला होता. सीएसएमआयएवरून वार्षिक हज फ्लाइट्स वर्षभरात दोन महिन्यांच्या कालावधीसाठी कार्यरत असतात. २०२४ साठी डिपार्चर फ्लाइट्स २५ मेपासून सुरू झाल्या आहेत आणि १२ जूनपर्यंत कार्यरत राहणार आहे. परत येणाऱ्या यात्रेकरूंचे आगमन जुलै २०२४ मध्ये सुरू होण्यासाठी तात्पुरते नियोजन करण्यात आले आहे.
[read_also content=”इंडिगो फ्लाइटला बॉम्बची धमकी, प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या अन्… पाहा VIDEO https://www.navarashtra.com/india/delhi-to-varanasi-indigo-flight-evacuated-due-to-bomb-threat-all-passengers-safe-539269.html”]
सीएसएमआयए सौदी अरेबियाकरिता प्रबळ वेळापत्रकाचे नियोजन करते, जेथे इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा व सौदीया एअरलाइन्स यासारख्या एअरलाइन्स एकत्रित दररोज ११ फ्लाइट्स ऑपरेट करतात. हजच्या वर्दळीच्या काळात सौदीया एअरलाइन्सवर सीएसएमआयएमधून ऑफिशियल हज रहदारीची हाताळणी करण्याची जबाबदारी असेल. यात्रेकरूंच्या प्रवासामधील लक्षणीय वाढीची पूर्तता करण्यासाठी १०१ अतिरिक्त फेरी फ्लाइट्स निर्गमन व आगमनांसाठी नियोजित करण्यात आल्या आहेत, ज्यामधून सर्व हज यात्रेकरूंना आरामदायी व कार्यक्षम प्रवास अनुभव देण्याप्रती सीएसएमआयएची कटिबद्धता दिसून येते.
तसेच, सीएसएमआयए टर्मिनल २ मध्ये विशेषत: हज यात्रेकरूंना सुविधा व सेवांची सर्वसमावेशक श्रेणी देण्यास सज्ज आहे. या सुधारणा हा महत्त्वपूर्ण प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सुलभ व आरामदायी अनुभव देण्यासाठी करण्यात आला आहेत.
सीएसएमआयएला हजचे आध्यात्मिक महत्त्व ओळखत हज यात्रेकरूंना पाठिंबा देण्याचे सन्माननीय वाटते. सीएसएमआयए या वर्षी आगमन व निर्गमनांसह जवळपास ६५,००० यात्रेकरूंची हाताळणी करण्यास सज्ज असताना विमानतळ विनासायास, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास अनुभवाची खात्री घेण्याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आहे. सीएसएमआयए अपवादात्मक आदरातिथ्य दाखवण्यासाठी सज्ज आहे, तसेच हजारो हज यात्रेकरूंसाठी हा प्रवास सुलभ करण्याप्रती कटिबद्ध आहे.