RBI sets up 'Mule-Hunter Team' to recover money from cyber fraud (PHOTO-SOCIAL MEDIA)
रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रवि शंकर यांनी एसबीआयच्या बँकिंग परिषदेत बोलताना याबद्दल माहिती दिली. या वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी RBI ने त्याची दखल घेतली आहे. मागच्या वर्षी तब्बल ३६,००० हून अधिक फसवणुकीच्या घटना घडल्या होत्या. कार्ड आणि इंटरनेटद्वारे जास्त फ्रॉड डिजिटल पेमेंट्समध्ये झाले आहे. त्यातल्याच 60 टक्के फसवणुकीच्या घटना खासगी बँकांद्वारे घडल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 2025 च्या अखेरीस ७१ टक्क्यांहून जास्त रकमेची फसवणूक करण्यात आली आहे.
हेही वाचा : Demonetization: 9 वर्षापूर्वी PM Modi यांनी केली अशी घोषणा, देशभरात भूकंप; बँकांसमोरील रांगा थांबेना!
आधी एवढ्या सायबर गुन्हेच्या घटना अधिक होत नव्हत्या. मात्र, काही महिन्यांपासून यात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. या घटनांची गंभीर दखल रिझर्व्ह बँकेने घेतली असून डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या घटनांचे नेमके कारण काय याची तपासणी रिझर्व्ह बँक करत आहे. या सगळ्यावर उपाय म्हणून रिझर्व्ह बँकेने ‘म्यूल-हंटर’ नावाची प्रणाली सुरू केली आहे. सायबर फसवणुकीतून पैसे परत मिळवण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. फसवणुकीचे पैसे ज्या खात्यांमध्ये जातात, ही प्रणाली ती खाती शोधायला मदत करत असून याने ग्राहकांचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : SEBI Updates for Investors: SEBI चे नवे गुंतवणूक नियम..; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी की आव्हान?






