Stock Market Today: डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम? तज्ज्ञांनी दिला सावध राहण्याचा इशारा
गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सौम्य सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,९१० च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ३५ अंकांनी जास्त होता. सोमवारी, भारतीय शेअर बाजाराने उच्चांक गाठला आणि पाच दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला, निफ्टी ५० २५,८०० च्या पातळीजवळ बंद झाला. सेन्सेक्स ३०१.९ ३ अंकांनी म्हणजेच ०.३६% ने वाढून ८३,८७८.१७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १०६.९५ अंकांनी म्हणजेच ०.४२% ने वाढून २५,७९०.२५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंटमधील डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स हेड चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. टपारिया यांनी शिफारस केलेल्या स्टॉक्समध्ये अल्केम लॅबोरेटरीज , इंडसइंड बँक आणि कोल इंडियाचे शेअर्सचा समावेश आहे.
आजच्या व्यवहारात गुंतणूकदार आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ, आयसीआयसीआय लोम्बार्ड, जस्ट डायल, टाटा एलेक्ससी, बँक ऑफ महाराष्ट्र, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, ओला इलेक्ट्रिक, लार्सन अँड टुब्रो, बायोकॉन, आनंद राठी वेल्थ, केपी ग्रीन एनर्जी, एनएलसी इंडिया, टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. सुमीत बगाडिया (चॉईस ब्रोकिंग), गणेश डोंगरे (आनंद राठी) आणि शिजू कूथुपलक्कल (प्रभूदास लिल्लाधर) बाजारातील या तज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली. यामध्ये होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड, HDFC बँक लिमिटेड, कोल इंडिया लिमिटेड, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि कोफोर्ज लिमिटेड यांचा समावेश आहे.
BMW India Record Sales: BMW Group India ची विक्रमी वार्षिक कामगिरी; 18,001 कार विक्रीसह 14% वाढ
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतणूवकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये इंडसइंड बँक, एनएमडीसी आणि ऑइल इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतणवूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट शेअर्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, अल्केम लॅबोरेटरीज आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.






