Stock Market Today: कशी होणार आठवड्याची सुरुवात? कोणते शेअर्स उघडणार गुंतवणूकदारांच नशिब? जाणून घ्या
१६ जून रोजी आज शेअर बाजारात काय परिस्थिती असणार आहे? कोणते शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरणार आहेत? आजच्या शेअर बाजाराविषयी तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे? आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजाराची सुरुवात कशी होणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या लेखात मिळणार आहेत.
१३ जून रोजी शुक्रवारी, देशांतर्गत शेअर बाजार सलग दुसऱ्या सत्रात घसरणीसह बंद झाला, बेंचमार्क निफ्टी ५० २४,८०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स ५७३.३८ अंकांनी म्हणजेच ०.७०% ने घसरून ८१,११८.६० वर बंद झाला, तर निफ्टी ५० १६९.६० अंकांनी म्हणजेच ०.६८% ने घसरून २४,७१८.६० वर बंद झाला. आठवड्याच्या शेवटी झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात काय परिस्थिती असणार आहे, याबाबत तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, १६ जून रोजी आज सोमवारी इस्रायल-इराण युद्धामुळे मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षादरम्यान जागतिक बाजारपेठेत भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० साठी संमिश्र संकेत देण्यात आले आहेत. आरपीजी लाईफ सायन्सेस लिमिटेड, गुडलक इंडिया लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड, अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड आणि टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड हे स्टॉक्स आज गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
ज्या गुंतवणूकदारांना १०० रुपयांपेक्षा कमी किंंमतीचे स्टॉक्स खरेदी करायचे आहेत, त्यांच्यासाठी गुंतवणूकदारांनी स्नोमॅन लॉजिस्टिक्स, आयडीएफसी फर्स्ट बँक, जीएमआर एअरपोर्ट्स, धानी सर्व्हिसेस, एसपीआयसी आणि सिगाची इंडस्ट्रीज या स्टॉक्सची शिफारस केली आहे.
मध्यरात्री Apple Store मध्ये गोंधळ! मास्क घातला, चेहला लपवला आणि केली iPhones ची चोरी; Video Viral
सोमवारी आज भारतीय बाजारांसाठी संमिश्र संकेत मिळत आहेत. गिफ्ट निफ्टीमध्ये थोडीशी वाढ दिसून येत आहे. आशिया आणि डाऊ फ्युचर्समध्येही वाढ झाली. परंतु इराण-इस्रायल संघर्षादरम्यान, शुक्रवारी अमेरिकन बाजार १.७५% ने घसरले. आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक जिगर एस. पटेल यांनी आज गुंतणूकदारांना स्विगी, बायोकॉन आणि रूट मोबाईलचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. स्विगी अलीकडेच घसरणीच्या मार्गातून बाहेर पडला आणि ₹ ३७६ वर पोहोचला, जो तेजीचा वेग दर्शवितो.