DoT ने लागू केला नवा नियम! एक सोपी पद्धत.. क्षणातच प्रीपेड वरून पोस्टपेड होणार तुमचा नंबर, वाचा सविस्तर
आपला मोबाईल रिचार्ज करण्याच्या दोन पद्धती असतात, एक प्रीपेड आणि दुसरी पोस्टपेड. बहुतेक लोकं प्रीपेड पद्धतीचा वापर करतात. ज्यामध्ये युजर्स आधी रिचार्जचे पैसे देऊन नंतर रिचार्जमधील वेगवेगळ्या सुविधांचा वापर करू शकतो. तर पोस्टमध्ये युजर्स आधी वेगवेगळ्या सुविधांचा वापर करून महिन्याच्या शेवटी रिचार्जचे बिल भरू शकतो. पोस्टपेड आणि प्रीपेड सेवांचा वापर करणाऱ्या मोबाईल युजर्ससाठी दूरसंचार विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Father’s Day 2025: यंदाच्या फादर्स डे ला आपल्या वडीलांना करा खुश, गिफ्ट करा हे Useful Gadgets
दूरसंचार विभागाने आता मोबाईल युजर्ससाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जिओ, एयरटेल, बीएसएनएल आणि वीआय सारख्या सर्व प्रीपेड आणि पोस्टपेड युजर्ससाठी जारी करण्यात आला आहे. ज्या युजर्सना त्यांचं नेटवर्क प्रीपेड वरून पोस्टपेड किंवा पोस्टपेड वरून प्रीपेडमध्ये बदलायचं आहे, त्यांच्यासाठी हे निर्णय महत्त्वाचे आहेत. आता नेटनर्कमध्ये बदल करणं अगदी सोपं झालं आहे. आधी नेटवर्क प्रीपेड वरून पोस्टपेड किंवा पोस्टपेड वरून प्रीपेडमध्ये बदलायचं असेल तर 90 दिवस वाट पाहावी लागत होती. मात्र आता ही प्रक्रिया केवळ 30 दिवसांत पूर्ण होणार आहे. ही प्रक्रिया OTP-बेस्ड KYC द्वारे पूर्ण केली जाऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
📱 Switching between Prepaid ↔️ Postpaid got easier through OTP!
⏱️ Cooling-off period for first-time reconversion reduced from 90 days to 30 days.
🔁 Need to switch sooner? Use KYC at PoS or authorized outlets! pic.twitter.com/kWbPcGsanZ
— DoT India (@DoT_India) June 12, 2025
DoT ने एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे की, आता युजर्स त्यांचे विद्यमान मोबाइल कनेक्शन केवळ 30 दिवसांच्या आत बदलू शकतील. यासाठी त्यांना संबंधित दूरसंचार कंपनीच्या दुकानात जावे लागेल आणि ओटीपीद्वारे केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
21 सप्टेंबर 2021 रोजी लागू केलेल्या जुन्या नियमात असं सांगण्यात आलं होतं की, युजर्सना त्यांचं नेटवर्क प्रीपेड वरून पोस्टपेड किंवा पोस्टपेड वरून प्रीपेडमध्ये बदलायचं असेल 90 दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र आता हा कालावधी कमी करण्यात आला आहे. आता हा कालावधी केवळ 30 दिवसांचा करण्यात आला आहे. खराब नेटवर्क किंवा सेवेमुळे प्लॅन बदलू इच्छिणाऱ्या युजर्ससाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
Ahemdabad Plane Crash : टेकऑफ की लँडिंग… कधी असतो विमान क्रॅश होण्याचा सर्वाधिक धोका? वाचा सविस्तर
हा नियम केवळ अशा युजर्ससाठी लागू केला जाणार आहे जे पहिल्यांदा त्यांचं नेटवर्क प्रीपेड वरून पोस्टपेड किंवा पोस्टपेड वरून प्रीपेडमध्ये बदलणार आहेत. याचा अर्थ असा की यूजरला पहिल्यांदाच प्लॅन बदलण्यासाठी फक्त 30 दिवस वाट पहावी लागेल.