Stock Market Today: आज सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा वाढणार? काय म्हणाले तज्ज्ञ? जाणून घ्या
१७ जून रोजी आज भारतीय शेअर बाजारात काय स्थिती असणार आहे? आज गुंतवणूकदारांसाठी कोणते शेअर्स फायद्याचे ठरणार आहे? याबाबत तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे? गुंतवणूकदारांना कोणते शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे? याबाबत आता जाणून घेऊया.
AI चोरतोय तुमच्या फोनमधील महत्त्वाची माहिती? कोणते टूल्स करतायत तुमची हेरगिरी? जाणून घ्या सर्वकाही
जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांनंतर भारतीय शेअर बाजाराबाबत काही अंदाज वर्तवण्यात आला आहे. १७ जून रोजी आज भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० ची सुरुवात सपाट पातळीवर होण्याची शक्यता आहे. आज गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची कमकुवत सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९७४ च्या आसपास व्यवहार करत होता. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड देखील आज भारतीय शेअर बाजाराची सपाट पातळीवर सुरुवात होण्याचे संकेत देत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
सोमवारी, देशांतर्गत शेअर बाजाराने मोठी तेजी दाखवली, बेंचमार्क निफ्टी ५० २४,९०० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स ६७७.५५ अंकांनी म्हणजेच ०.८४% ने वाढून ८१,७९६.१५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २२७.९० अंकांनी म्हणजेच ०.९२% ने वाढून २४,९४६.५० वर बंद झाला. त्यामुळे काल सोमवारी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. कालच्या तेजीनंतर शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ४१७.५५ अंकांनी किंवा ०.७५% ने वाढून ५५,९४४.९० वर बंद झाला, ज्यामुळे सलग चार सत्रातील तोटा कमी झाला असल्याचं तज्ज्ञाचं मत आहे.
Instagram युजर्ससाठी आनंदाची बातमी! लवकरच मिळणार फीचर्सचा डबल बोनस, काय असणार खास? जाणून घ्या
MOFSL च्या वेल्थ मॅनेजमेंटच्या डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स प्रमुख चंदन टपारिया यांनी आज १७ जून रोजी गुंतवणूकदारांना भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL), ओबेरॉय रिअॅलिटी आणि KPIT टेक्नॉलॉजीजचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ज्या गुंतवणूकदारांना १०० रुपयांपेक्षा कमी किंंमतीचे स्टॉक्स खरेदी करायचे आहेत, त्यांच्यासाठी गुंतवणूकदारांनी जीएमआर एअरपोर्ट्स, सिगाची इंडस्ट्रीज , निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी आणि पंजाब अँड सिंध बँक (पीएसबी) या स्टॉक्सची शिफारस केली आहे. स्टॉक मार्केट टुडेचे सह-संस्थापक आणि बाजार तज्ञ व्हीएलए अंबाला म्हणाले, आजच्या इंट्राडे ट्रेडिंग सत्रात निफ्टीला २४,९०० ते २४,७५० दरम्यान आधार मिळेल आणि २५,१८० ते २५,२५० च्या जवळ प्रतिकाराचा सामना करावा लागेल.