Stock Market Today: कसा होणार आठवड्याचा शेवट? काय म्हणाले तज्ज्ञ? गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या सर्वकाही
20 जून रोजी आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात कशी होणार, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. आज भारतीय शेअर बाजारात काय होणार, कोणते शेअर्स गुंतवणूकदारांच्या फायद्याचे ठरणार, याबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी काही अंदाज वर्तवला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आज 20 जून रोजी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मंद होण्याची शक्यता आहे.
काय सांगता! आता चार लोकं एकत्र करू शकतात डेट, Tinder ने लाँच केलेल Double Date फीचर आहे तरी काय?
गुरुवारी, देशांतर्गत शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांकात किंचित घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. निफ्टी ५० २४,८०० च्या पातळीच्या खाली बंद झाला. सेन्सेक्स ८२.७ ९ अंकांनी म्हणजेच ०.१०% ने घसरून ८१,३६१.८७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १८.८० अंकांनी म्हणजेच ०.०८% ने घसरून २४,७९३.२५ वर बंद झाला. शेअर बाजारातील कालच्या परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर निफ्टी पीएसयू बँका, मीडिया, रिअल्टी, मेटल आणि आयटीमध्ये सर्वात लक्षणीय घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये विक्रीचा मोठा दबाव दिसून आला, निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक १.६३% ने घसरला, तर निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक २% ने घसरला. (फोटो सौजन्य – Pinterest)
जागतिक बाजारपेठेतील संमिश्र संकेतांमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, मंदावलेल्या स्थितीत उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंद असल्याचे दर्शवितात. गुंतवणूकदारांनी आज कोणते शअर्स खरेदी करावेत, कोणते शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरणार आहेत, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
१०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्यासाठी तज्ज्ञांनी चार स्टॉक्सची शिफारस केली. ज्यामध्ये ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक , सॅट इंडस्ट्रीज , इमॅजिकावर्ल्ड एंटरटेनमेंट आणि मोरेपेन लॅबोरेटरीज यांचा समावेश आहे. नेस्ले इंडिया, साई लाईफ सायन्सेस, एचडीएफसी बँक, केन्स टेक्नॉलॉजी, एलटीआय माइंडट्री, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इथोस, नॅटको फार्मा, अशोका बिल्डकॉन, अॅक्सिसकेड्स टेक्नॉलॉजीज, हे स्टॉक्स आज गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
MOFSL च्या वेल्थ मॅनेजमेंटच्या डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स प्रमुख चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकदारांना भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. दुसरीकडे, त्यांनी गुंतवणूकदारांना इंडियन एनर्जी एक्सचेंज (IEX) स्टॉक फ्युचर्स हे शेअर्स विकण्याची शिफारस केली आहे. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना जेएसडब्ल्यू एनर्जी , विशाल मेगा मार्ट आणि व्होल्टास हे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.