Stock Market Today: आज सपाट पातळवीर शेअर बाजाराची सुरुवात होण्याची शक्यता, काय म्हणाले तज्ज्ञ?
आठवड्याच्या सुरुवातीपासून शेअर बाजारात घसरण सुरु होती. मात्र बुधवारी देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांकांनी वाढ नोंदवली. शिवाय शेअर बाजाराची सुरुवात देखील काल सकारात्मक झाली होती. कालच्या वाढीनंतर आज शेअर बाजारात काय परिस्थिती असणार आहे, आज गुंवणूकदारांसाठी कोणते शेअर्स फायद्याचे ठरणार आहेत आणि आज शेअर बाजाराची सुरुवात कशी होणार, याबद्दल तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे जाणून घेऊया.
जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात. बुधवारी, देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांकांनी वाढ नोंदवली आणि तीन दिवसांपासून सुरु असलेली घसरण थांबवली. बुधवारी सेन्सेक्स २६०.७४ अंकांनी म्हणजेच ०.३२% ने वाढून ८० ,९९८.२५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ७७.७० अंकांनी म्हणजेच ०.३२% ने वाढून २४,६२०.२० वर बंद झाला.निफ्टीमध्ये इटरनल, जिओ फायनान्शियल आणि इंडसइंड बँक हे प्रमुख वधारलेले शेअर होते, तर बजाज फिनसर्व्ह, ट्रेंट आणि आयशर मोटर्स हे प्रमुख तोट्यात होते . (फोटो सौजन्य – Pinterest)
तज्ज्ञांनी शिफारस केली आहे की, आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार खरेदी किंवा विक्रीसाठी सुप्रीम इंडस्ट्रीज , लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी, बीईएल, सीईएसई, लोधा, आयओबी, सीजी पॉवर आणि एनबीसीसी या स्टॉक्सचा विचार करू शकतात. याशिवाय तज्ज्ञांनी बेलराईज इंडस्ट्रीज, टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स आणि नाल्को हे तीन खरेदी-विक्री स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
गुंतवणूकदारांनी आजच्या व्यवहारात वेदांत, वॉरी एनर्जीज, ग्लँड फार्मा, येस बँक, स्वदेशी, आरईसी, बीईएल, पॉवर ग्रिड, केईसी इंटरनॅशनल, एनटीपीसी ग्रीन एनर्जी या स्टॉक्सवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खेरदी केल्या जाणाऱ्या स्टॉक्समध्ये आज बेलराईज इंडस्ट्रीज, आयओबी, श्रीराम प्रॉपर्टीज, एसजेव्हीएन आणि जैन इरिगेशन सिस्टम्स यांची शिफारस करण्यात आली आहे.
सलग तीन सत्रांमध्ये घसरण झाल्यानंतर, बुधवारी भारतीय शेअर बाजारात उलटा ट्रेंड दिसून आला. निफ्टी ५० निर्देशांक ७७ अंकांनी वाढून २४,६२० वर, बीएसई सेन्सेक्स २६० अंकांनी वाढून ८०,९९८ वर आणि बँक निफ्टी निर्देशांक ७६ अंकांनी वाढून ५५,६७६ वर बंद झाला. निफ्टीमध्ये इटरनल, जिओ फायनान्शियल आणि इंडसइंड बँक हे प्रमुख वधारलेले शेअर होते, तर बजाज फिनसर्व्ह, ट्रेंट आणि आयशर मोटर्स हे प्रमुख तोट्यात होते .