अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांचा १०० बिलियन अमेरिकन डॉलर्स संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत समावेश झाला आहे. अदानी यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकलं असून ते भारतातील सर्वात श्रीमंत (Richest Person Of India) व्यक्ती ठरले आहेत. ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या आकेडवारीतून ही माहिती समोर आली.
[read_also content=”औरंगाबादमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न; तब्बल १५ दिवस नागरिकांना पाणी नाहीच, शहरात भाजप कार्यकर्त्यांसह महिलांचा भव्य हंडा मोर्चा https://www.navarashtra.com/maharashtra/marathwada/aurangabad-water-march-people-marches-on-road-for-delay-in-water-supply-nrak-264002.html”]
सध्या ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे सर्वोसर्वा एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानी अॅमेझॉनचे जेफ बेझोस तर तिसऱ्या स्थानी बर्नार्ड आरनॉल्ट तिसऱ्या स्थानी आहेत.
अदानी यांच्या संपत्तीमध्ये २४ बिलियन अमेरिकन डॉलर्सने वाढ झाली असून ते जगातील सर्वाधिक संपत्ती कमवणारे व्यक्ती ठरलेत. मागील वर्षभरापासून त्यांची संपत्ती प्रत्येक आठवड्याला सहा हजार कोटींची वाढत आहे. एकूण संपत्तीच्या यादीनुसार सध्या अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १० व्या स्थानी आहेत. या यादीमध्ये अंबानी हे ११ व्या स्थानी आहेत. त्यांनी ऑक्टोबर महिन्यात अव्वल दहामध्ये स्थान मिळवलं होतं. मात्र सध्या त्यांच्या स्थानामध्ये थोडी घसरण झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ९९ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. या यादीत फेसबुकला मार्क झुकरबर्ग हा १२ व्या स्थानी आहे.
मागील दोन वर्षांमध्ये अदानी समूहाच्या शेअर्सची किंमत ६०० टक्क्यांनी वाढली आहे. २०७० मध्ये भारताचं झीरो कार्बन उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेला प्राधान्य देण्यात येत असल्याने भविष्यातही अदानी समूहाला अच्छे दिन येणार असल्याचं म्हटलं जात आहे.