Share Market Today: घसरणीसह उघडणार बाजार, तज्ज्ञांनी दिले संकेत! इन्फोसिस, विप्रोसह आज 'या' शेअर्सची करा खरेदी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा शुल्कात वाढ केल्यानंतर भारतीय आयटी कंपन्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्वांचा विचार करता आज २२ सप्टेंबर रोजी सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,३२० च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ९१ अंकांनी कमी होता.
शुक्रवारी, नफा बुकिंगमुळे शेअर बाजार निर्देशांक कमी झाले, बेंचमार्क निफ्टी ५० २५,४०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स ३८७.७३ अंकांनी म्हणजेच ०.४७% ने घसरून ८२,६२६.२३ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ९६.५५ अंकांनी म्हणजेच ०.३८% ने घसरून २५,३२७.०५ वर बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक २६८.६० अंकांनी किंवा ०.४८% ने घसरून ५५,४५८.८५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, हुडको, रेलटेल कॉर्प, एनटीपीसी, येस बँक, ल्युपिन, हरिओम पाईप इंडस्ट्रीज, ऑइल इंडिया, पीएनसी इन्फ्राटेक, पॉवर ग्रिड या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.
आठ वर्षांनंतर, कर प्रणालीमध्ये लक्षणीय सुधारणा होत आहेत. हे नवीन नियम आज सोमवार, २२ सप्टेंबरपासून लागू होत आहे. मध्यम ते दीर्घकालीन काळात भारतीय अर्थव्यवस्था आणि बाजारपेठांना जीएसटी सुधारणा चालना देतील अशी अपेक्षा व्यक्त करताना, एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजच्या वरिष्ठ संशोधन विश्लेषक सीमा श्रीवास्तव म्हणाल्या, “अलीकडील जीएसटी सुधारणांचा भारतातील भांडवली बाजार आणि विविध उद्योगांवर लक्षणीय परिणाम होण्याची अपेक्षा आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसी सारख्या कंपन्यांसाठी विक्री आणि महसूल वाढण्याची शक्यता जास्त असेल. ग्रीन मोबिलिटीला पाठिंबा मिळेल आणि टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकी सारख्या कंपन्यांसाठी वाढीला चालना मिळेल.
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये मिंडा कॉर्प, सीईएससी आणि सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठीपाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये अनंत राज, तनला प्लॅटफॉर्म्स, सेंटम इलेक्ट्रॉनिक्स, कार्ट्रेड टेक आणि पीसीबीएल केमिकल यांचा समावेश आहे.
आज खरेदी करायच्या स्टॉकबाबत, बाजारातील तज्ञ आणि चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये अॅस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रॉडक्ट्स लिमिटेड, अजमेरा रिअॅल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड, रॅलिस इंडिया लिमिटेड, किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड, सीईएससी लिमिटेड आणि सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचा समावेश आहे.