सोयाबीनचा भाव (फोटो सौजन्य - iStock)
हिंगोली: यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तौडाशी आलेला सोयाबीनचा घास अक्षरशः पावसाने हिरावून नेला. आता जे काही थोडेफार शिल्लक राहिले, तेही शेतकऱ्यांना कवडीमोल दराने विकावे लागत आहे. दिवाळीनंतर दर वाढतील, अशी अपेक्षा होती; मात्र ती अपेक्षाही फोल ठरली आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीनचे पीक जमिनीसकट वाहून गेले. उत्पादनात तब्बल ५० ते ६० टक्के घट झाली असून, बाजारात सध्या फक्त ३२०० ते ३७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहेत. हे दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे. शेतकऱ्यांना आता लागवड खर्चही निघेनासा झाला आहे. एकरी १५ ते १८ हजार रुपये खर्च करूनही उत्पन्न खर्चाच्या पातळीवर पोहोचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
३२०० ते ३७०० रुपये प्रति क्विंटल दर
पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. इतकंच नाही तर सोयाबीनचा सध्याचा दर हा प्रति क्विंटल ३२०० ते ३७०० लावण्यात आल्याने शेतकरी प्रचंड भडकले आहेत आणि सरकारविरूद्ध नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय सध्या पावसामुळे अत्यंत वाईट परिस्थिती असून अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती आहे आणि त्यात मालाला कमी भाव मिळाल्याने हालाखाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
हमीभाव केंद्र तातडीने सुरू करा, अन्यथा आंदोलन करू : माधव कोरडे
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना राज्य सरकारकडून अजूनही हमीभाव केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचा जीवावर बेतलेला सोयाचीन हमीभावाशिवाय विकण्याची वेळ येणे ही शासनाची मोठी निष्काळजीपणा आहे. जिल्ह्यात तातडीने हमीभाव केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा द्यावा लागेल, अशी तीव मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते माधव कोरडे यांनी केली आहे.
मांस-अंड्यांपेक्षाही जास्त फायदेशीर आहे सोयाबीन, नियमित सेवनाने होतील असे लाभ
FAQs (संबंधित प्रश्न)
१. सोयाबीनचा आजचा भाव काय आहे?
सध्याच्या बाजारभावानुसार, महाराष्ट्रात सोयाबीनचा सरासरी भाव ₹४०३६.४८/क्विंटल आहे.
२. २०२५ मध्ये सोयाबीनच्या किमती कधी वाढतील?
२०२५ मध्ये सोयाबीनच्या किमती अनेक घटकांवर अवलंबून चढ-उतार होण्याची अपेक्षा आहे. जागतिक मागणीत वाढ आणि उत्पादन खर्चात संभाव्य वाढ यामुळे अंदाजे ८% वाढ होऊ शकते. शिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मजबूती आणि सरकारी धोरणांचा देखील किमतींवर परिणाम होईल.
३. नांदेडमध्ये आज सोयाबीनचा बाजारभाव किती आहे?
नांदेडमध्ये आज सोयाबीनचा सरासरी बाजारभाव अंदाजे ₹३९०० प्रति क्विंटल आहे, ज्याची किमान किंमत ₹३८०० आणि कमाल किंमत ₹४१०० प्रति क्विंटल आहे. ही माहिती १६ ऑक्टोबर २०२५ च्या आकडेवारीवर आधारित आहे.






