सचिन तेंडुलकर बनवणार बिझनेसमन; ...सुरु करतोय स्वतःचा स्पोर्ट्स ब्रँड!
क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकर याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली. तरी त्याने निवृत्तीनंतर वेगवेगळ्या माध्यमातून आपली इनिंग सुरूच ठेवली आहे. सचिन हा राज्यसभाचा सदस्य राहिला आहे. सचिनने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतो. विशेष म्हणजे त्यास क्रिकेटप्रमाणेच आतापर्यंत बिझनेसमध्ये देखील यश मिळत आहे. हीच बाब लक्षात घेऊन आता सचिन तेंडुलकर बिझनेसमध्ये देखील आपली इंनिंग खेळत आहे.
कार्तिक गुरुमूर्ति, करण अरोडा यांच्या भेटीनंतर मुद्दा चर्चेत
अशातच आत सचिन तेंडुलकर आपला स्वतःचा स्पोर्ट्स ब्रँड सुरु करणार आहे. याबाबत माहितीसमोर आली आहे की, सचिनने अलीकडेच स्विगी इंस्टामार्टचे माजी प्रमुख कार्तिक गुरुमूर्ति यांची भेट घेतली आहे. याशिवाय स्विगी इंस्टामार्टचे करण अरोडा हे देखील त्यांच्या स्पोर्ट्स ब्रँडसोबत जोडले जाणार आहे. त्यामुळे आता कार्तिक गुरुमूर्ति आणि करण अरोडा यांच्या भेटीनंतर सचिनच्या नवीन स्पोर्ट्स ब्रँडची चर्चा होऊ लागली आहे.
हेही वाचा : ‘या’ बँकेच्या कोट्यवधी कर्जदारांना मोठा झटका; व्याजदरात मोठी वाढ, कर्ज महागणार!
ब्रँडसाठी कंपनी देखील स्थापन
एका नामांकित वृत्तसमूहाच्या वृत्तानुसार, सचिन तेंडुलकर आपल्या नवीन स्पोर्ट्स ब्रँडसाठी एक कंपनी देखील तयार केली आहे. सचिनच्या या स्टार्टअप्सला व्हाइटबोर्ड कॅपिटल देखील साहाय्य करणार आहे. सचिनच्या या स्पोर्ट्स ब्रँडसाठी ‘एसआरटी 10 एथलीजर प्रायवेट लिमिटेड’ नावाची कंपनी देखील स्थापित करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार सचिनचा हा ब्रँड सध्या कंपनीसाठी पैसे उभारण्याचे काम करत आहे.
कमवतात अनेक कंपन्यांच्या जाहिरातींमधून पैसा
दरम्यान, सचिन तेंडुलकर हे क्रिकेटमधून निवृत्तीनंतर देखील अनेक स्पोर्ट्स कंपन्यांचे ब्रँड अँबेसिडर राहिले आहेत. ते सध्याच्या घडीला अनेक कंपन्यांची जाहिरात करून पैसे कमावतात. मात्र, ते आपल्या स्पोर्ट्स ब्रँडच्या स्टार्टअपमध्ये ते फक्त कंपनीचा चेहराच बनवणार नाहीये. तर ते आता आपल्या स्पोर्ट्स ब्रँड कंपनीचे फाउंडर म्हणून देखील काम करणार आहे.
‘या’ खेळांडूंचाही आहे स्पोर्ट्स ब्रँड
दरम्यान, सचिन तेंडुलकर हे ट्रू ब्लू नावाच्या फॅशन ब्रँडचे हिस्सेदार आहेत. ते अरविंद फॅशन कंपनीसोबत पार्टनर आहेत. याशिवाय माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी, स्टार फलंदाज विराट कोहली, कॅटरिना कैफ आणि दीपिका पदुकोण हे देखील अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करून बिझनेसमध्ये स्वतःला आजमावत आहेत.