शेअर मार्केटमध्ये काही मल्टीबॅगर शेअर्स आहेत. ज्यांनी गुंतवणूकदारांना अल्पावधीत करोडपती बनवले आहे. विशेष म्हणजे यात असेही काही मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत. ज्यांनी गुंतवणूकदारांना केवळ वर्षभरात करोडपती केले आहे. अशातच आता एक मल्टीबॅगर स्टॉक गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहे. या शेअरमध्ये 2 टक्क्यांच्या वरती सर्किट असल्याचे दिसत आहे.
श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड असे या शेअरचे नाव असून, शुक्रवारी (ता.२२) हा शेअर दोन टक्क्यांच्या वरती सर्किटला होता. सध्या या शेअरची किंमत 1,733.10 रुपये आहे. या शेअरने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. यामध्ये गुंतवणूकदार एका वर्षात करोडपती झाले आहेत.
अडीच महिन्यांत पैसे दुप्पट
या शेअरने अडीच महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. 11 सप्टेंबर रोजी एका शेअरची किंमत 672.20 रुपये होती. आता तो 1,733.10 रुपये इतका झाला आहे. शेअरची ही किंमत दुप्पटीपेक्षा थोडी अधिक आहे. अशा परिस्थितीत, दोन महिन्यांपेक्षा थोड्या जास्त कालावधीत गुंतवणूक दुप्पट झाली आहे.
हे देखील वाचा – शेअर बाजार सावरला… सेन्सेक्सची 1900 अंकाने उसळी; निफ्टी 23900 अंकांच्या पार!
6 महिन्यांत 10 वेळा परतावा
श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेडच्या या शेअरने ६ महिन्यांत गुंतवणूकदारांचे खिसे भरले आहेत. या कालावधीत गुंतवणूकदारांना 10 पट जास्त परतावा मिळाला आहे. सहा महिन्यांपूर्वी श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेडच्या शेअरची किंमत 147.20 रुपये इतकी होती. या कालावधीत या शेअरने 1077 टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये किमतीचे शेअर्स विकत घेतले असते. तर आज त्या शेअरची किंमत 11.77 लाख रुपये इतकी झाली असती. म्हणजेच तुम्हाला 10.77 लाख रुपये नफा झाला असता.
हे देखील वाचा – पेटीएमचा शेअर निम्म्या किंमतीत खरेदी करण्याची संधी; किंमत 1000 रुपयांपर्यंत जाणार?
काय करते ही कंपनी?
ही एक मीडिया कंपनी आहे. कंपनी ब्रॉडकास्ट, फिल्म, कंटेंट प्रोडक्शन आणि डिस्ट्रिब्युशनचा व्यवहार करते. ही कंपनी 1985 मध्ये कार्यरत असून, 1995 पासून ती शेअर बाजारात सूचिबद्ध झाली आहे. कंपनीचे मार्केट कॅप 4440 कोटी रुपये इतके आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)