Real Estate Market: देशभर घरविक्रीत घट; मात्र, 'या' शहरामध्ये घरविक्रीत झाली २९ टक्के वाढ (फोटो-सोशल मीडिया)
Real Estate Market: रिअल इस्टेट (real estate) क्षेत्राची स्थिती २०२५ मध्ये चांगली दिसून आली आणि मुंबईत तर या क्षेत्रासाठी गतवर्ष आशादायी राहिले. २०२४ च्या तुलनेत देशभरात घरांच्या विक्रीमध्ये एक टक्क्याची घट नोंदवली, मात्र मुंबईतील बाजारपेठेत मात्र घरविक्री जोमाने झाली. २०२५ मध्ये देशातील सर्वात मोठी गृहबाजारपेठ समोर येत देशाच्या तुलनेत २९ टक्के घरांची विक्री केवळ मुंबईतून झाली. नाईट फ्रैंक इंडियाच्या ‘इंडियाज रिअल इस्टेट-ऑफिस अँड रेसिडेन्शियल मार्केट २०२५’ या ताज्या अहवालानुसार, देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये एकूण अंदाजे ३,४८,००० घरे विकली गेली, जी मागील वर्षांच्या तुलनेत फक्त १ टक्क्यांनी कमी आहे. दरम्यान मुंबईत मात्र घरांच्या विक्रीचा जोर कायम राहिला. प्रीमियम घरांच्या मागणीमुळे किंमत वाढही दिसून आली. शहरात घरांच्या किंमतीही ७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
हेही वाचा: US Tariffs Impact on TamilNadu: अमेरिकन टॅरिफचा फटका; तामिळनाडूमध्ये ३० लाख नोकऱ्या धोक्यात
अहवालानुसार, २०२५ चा दुसरा सहामाही रिअल इस्टेटसाठी महत्त्वाचा होता. जुलै ते डिसेंबर दरम्यान, १.७८ कोटी घरे विकली गेली, जी २०१३ नंतरच्या दुसऱ्या सहामाहीतील सर्वाधिक आहे. यावरून असे दिसून येते की, उच्च किमती असूनही खरेदीदारांचा विश्वास अबाधित आहे. मुंबईत ९७,१८८ घरे विकली गेली, जी वर्षांनुवर्षे १ टक्के वाढ दर्शवते. याउलट, एनसीआरमध्ये विक्री ९ टक्क्यांनी घसरून ५२,४५२ युनिट्सवर आली, तर नवीन लाँचमध्ये १६ टक्के लक्षणीय घट झाली.
परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रावर दबाव राहिला. ५० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीत १७ टक्क्यांनी घट झाली, ज्यामुळे त्यांचा वाटा फक्त २१ टक्क्यांवर आला. तरीही, बाजार संतुलित राहिला आहे, न विकल्या गेलेल्या घरांच्या यादीत थोडीशी वाढ झाली असली तरी, तिमाही-ते-तिमाही विक्री गुणोत्तर ५.८ टक्क्यावर स्थिर राहिले, जे मागणी पुरवता संतुलनाचे चागले संकेत देते. किमती बाबत, मुंबईतील घराच्या किमती वर्षानुवर्षे ७टक्क्यांनी वाढल्या आहेत. अहवालात असा अंदाज आहे की नियंत्रित पुरवठा आणि मजबूत मागणीमुळे २०२६ मध्ये मुंबईचा रिअल इस्टेट बाजार देशातील आघाडीचा राहील.
मुंबई (Mumbai) बाजारपेठेला बळकटी देणारा एक प्रमुख घटक म्हणजे प्रीमियम सेगमेटमधील मजबूत मागणी राहिली. २०२५ मध्ये देशभरात १ कोटीपेक्षा पेक्षा जास्त किमतीच्या घरांचा वाटा ५० टक्क्यांपर्यंत वाढला, या श्रेणीत एकूण १७.५ कोटी युनिट्स विकल्या गेल्या, जी वर्षानुवर्षे १४ टक्के वाढ दर्शवते. मुंबईसारख्या महानगरांमध्ये हा ट्रेंड आणखी स्पष्ट आहे, जिथे मोठ्या आणि चांगल्या सुसज्ज घरांची मागणी वाढत आहे.






