चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्कचा नवा नियम (फोटो सौजन्य - iStock)
जर तुम्हाला चांदीचे दागिने घालण्याची आवड असेल आणि तुम्ही नियमित चांदी खरेदी करत असाल, तर १ सप्टेंबर २०२५ पासून नवीन प्रणालीसाठी सज्ज व्हायला तयार व्हा. सरकार चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नवा नियम आणत आहे. यामुळे ग्राहकांना दागिन्यांची गुणवत्ता ओळखणे सोपे होईल आणि फसवणूक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल.
ग्राहकांच्या फायद्यासाठीच हा नवा नियम असून चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्यांना याचा अधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. नक्की हा नियम का करण्यात आला आहे आणि काय आहे हा नियम जाणून घेऊया
सीएनबीसी आवाजच्या अहवालानुसार, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने निर्णय घेतला आहे की आता चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगची सुविधा उपलब्ध असेल. तथापि, सुरुवातीला ती अनिवार्य नसेल, तर ती ऐच्छिक असेल. म्हणजेच, ग्राहकाला हवे असल्यास, तो हॉलमार्क केलेले दागिने खरेदी करू शकतो किंवा हॉलमार्कशिवाय. जसे काही वर्षांपूर्वी सोन्याच्या दागिन्यांवर सुरू झाले होते.
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच, चांदीच्या दरात वाढ! सविस्तर जाणून घ्या
बीआयएसने चांदीसाठी ६ शुद्धता पातळी निश्चित केल्या आहेत – ९००, ८००, ८३५, ९२५, ९७० आणि ९९०. आता प्रत्येक चांदीच्या दागिन्यांना ६-अंकी युनिक हॉलमार्क आयडी (एचयूआयडी) दिला जाईल. या आयडीवरून लगेच कळेल की दागिने किती शुद्ध आहेत आणि ते बनावट आहेत की नाही.
हॉलमार्किंग म्हणजे काय? असा प्रश्न जर तुम्हाला असेल तर हॉलमार्किंग म्हणजे धातूच्या शुद्धतेची हमी. सरकारने ठरवलेल्या प्रक्रियेत, सोने किंवा चांदीसारख्या धातूंची बीआयएसच्या मानकांनुसार चाचणी आणि प्रमाणन केले जाते. यामुळे ग्राहकाला तो ज्या गुणवत्तेसाठी पैसे देत आहे त्याच गुणवत्तेची प्राप्ती होते.
१ सप्टेंबरपासून ग्राहकांना हॉलमार्क केलेले चांदी खरेदी करायचे की नॉन-हॉलमार्क केलेले दोन्ही पर्याय असतील. परंतु तज्ञांचा असा विश्वास आहे की बहुतेक लोक आता फक्त हॉलमार्क केलेल्या दागिन्यांवर विश्वास ठेवतील. यामुळे दागिने उद्योगही मजबूत होईल.
ग्राहकांसाठी अनेक फायदे मिळणार आहेत. या नियमाचा सर्वात मोठा फायदा ग्राहकांना होईल. आता बीआयएस केअर App वरील “Verify HUID” वैशिष्ट्याद्वारे लोक दागिन्यांवर लिहिलेले हॉलमार्किंग खरे आहे की बनावट आहे हे सहजपणे तपासू शकतात. हे बनावट आणि भेसळयुक्त दागिन्यांपासून संरक्षण करेल.
२०२१ मध्ये, सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य केले होते. त्याच धर्तीवर, आता ही प्रणाली चांदीवर देखील आणली जात आहे. यामुळे संपूर्ण दागिन्यांची बाजारपेठ अधिक पारदर्शक होईल आणि ग्राहकांचा विश्वासही वाढेल.
HDFC Bank ने बदलले Cash Transaction पासून चेकबुकपर्यंत नियम, ग्राहकांच्या खिशावर होणार थेट परिणाम