PM Kisan Scheme 21th installment ( photo - social media)
अतिवृष्टीने झालेल्या पिकांचे प्रचंड नुकसान शेकऱ्यांसाठी आर्थिक संकट आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्रसरकारने पीएम किसानचा 21 वा हप्ता आधीच वितरित केला असून याची अधिकृत सूचनेनुसार 7 ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरमधील8.5 लाख शेतकऱ्यांना एकूण 170 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे, इतर राज्यातील शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता कधी त्यांच्या खात्यात जमा होईल याची वाट बघत आहेत. मात्र, यासाठी शेतकऱ्यांना योजनेतील पुढील हप्त्यासाठी पात्र होण्यासाठी त्यांचे ई-केवायसी नोंदणी आणि अपडेट आवश्यक आहे.
हेही वाचा : GST रद्द केल्यावरही Health Insurance महाग, ग्राहकांना का मिळत नाही फायदा?
पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत, दर चार महिन्यांनी 2000 रु. मिळत असून दरवर्षी 6000 रु. त्यांच्या खात्यात जमा होतात. दरवर्षी एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जातात. आताची जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना म्हणून ओळखली जाते.
तुम्ही नोंदणीकृत शेतकरी असल्यास स्थिती कशी तपासावी?
पीएम किसान: अर्ज कसा करावा?
नवीन नोंदणी अधिकृत पोर्टलद्वारे ऑनलाइन किंवा सामान्य सेवा केंद्राद्वारे ऑफलाइन करता येते.
अधिकृत पोर्टलद्वारे ऑनलाइन प्रकिया –
सबमिट केल्यानंतर, अर्ज पडताळणीसाठी राज्य नोडल ऑफिसर (SNO) कडे जातो. मंजूर झाल्यानंतर, तुमचे नाव लाभार्थी यादीत समाविष्ट केले जाते.
तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे कसे तपासायचे






