'या' दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये; 'ही' प्रक्रिया पुर्ण कराच!
देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी. यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आतापर्यंत 17 हप्त्यांचे पैसे देण्यात आले आहे. अशातच आता शेतकरी 18 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. केंद्र सरकारकडून 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. त्यामुळे आता ऐन दसरा, दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत.
काय आहे ही योजना
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत प्रामुख्याने शेतकऱ्यांना तीन हप्त्यात दिली जाते. प्रत्येक हप्ता हा 2,000 रुपये आहे. साधारणपणे पीएम किसान सन्मान निधीचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान येतो.
वाशिममधून 18 वा हप्ता जारी होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथून 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहे. पीएम मोदी डीबीटीद्वारे 9.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर करणार आहेत. यासाठी सरकार 20 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी या योजनेशी संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यापूर्वी, पीएम किसानचा 17 वा हप्ता जून 2024 मध्ये रिलीज झाला होता. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर लाभार्थी यादी पाहून तुम्हाला समजेल की तुमच्या खात्यात पैसे येतील की नाही.
हे काम लगेच करा, तरच पैसे मिळतील
पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी 5 ऑक्टोबरपूर्वी काही काम करणे खूप महत्वाचे आहे. एक चूक करूनही फायदा होणार नाही. तुम्ही पीएम किसान योजनेशी संबंधित असाल तर बँक खात्याचे ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी व्यतिरिक्त पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्याने जमिनीची पडताळणी करणे देखील आवश्यक आहे. यासोबतच शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही तीन कामे पूर्ण केली आहेत त्यांना 18 व्या हप्त्याचा लाभ घेता येईल. असे सरकारी पातळीवरून सांगितले जात आहे.
काय आहे हेल्पलाइन नंबर
केंद्र सरकारने या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज केला असेल. त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही 155261 वर कॉल करू शकता. यावर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळू शकते.