गारमेंट कंपनीचा आयपीओ आजपासून खुला; केवळ 20-24 रुपयांमध्ये लावता येईल बोली!
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रीअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी कल्पतरु लवकरच आपला आयपीओ घेऊन येणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी तब्बल 1,590 कोटी रूपये उभारणार आहे. कल्पतरू या कंपनीकडून आपल्या आयपीओबाबतची कागदपत्रे भांडवली बाजार नियामक संस्था सेबीकडे सोपवण्यात आली आहेत. त्यामुळे आता गुंतवणुकदारांना मोठी संधी असणार आहे.
किती असेल ‘या’ आयपीओचा आकार?
कल्पतरुने सेबीकडे सादर केलेल्या माहितीनुसार, हा आयपीओ साधारण 1590 कोटी रुपयांचा असणार आहे. आयपीओतून उभ्या राहिलेले पैसे कंपनी कर्जाची परतफेड आणि कॉर्पोरेट कामांसाठी वापरणार आहे. या आयपीओसाठी कंपनी ऑफर फॉर सेलचा पर्याय न निवडता, संपुर्णपणे 100 टक्के नवीन शेअर जारी करणार आहे. या आयपीओसाठी प्रत्येक शेअरची किंमत ही 10 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हेही वाचा – असे न केल्यास …यावर्षी येणार आर्थिक मंदी; तज्ञांचा अमेरिकेच्या सेंट्रल बॅंकेला इशारा!
कुठे वापरणार कंपनी आयपीओचे कमाई?
कल्पतरु कंपनीच्या माहितीनुसार, कंपनी आपल्या आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या रकमेपैकी 1,192.5 कोटी रुपये हे कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. उर्वरित रक्कम इतर सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरली जाणार आहे. जून तिमाही अखेर कंपनीवर एकूण 10,747.69 कोटी रुपये इतके कर्ज होते. मोफ्तराज पी.मुनोत आणि पराग.एम.मुनोत हे या कंपनीचे प्रवर्तक आहेत.
काय करते ‘ही’ कंपनी
कल्पतरू ही कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठा ब्रँड आहे. ही कंपनी लक्झरी आणि प्रिमियम प्लॅट्ससाठी ओळखली जाते. या आर्थिक वर्षात कंपनीने अनेक नव्या प्रोजेक्ट्सवर काम चालू केले आहे. सध्या या कंपनीच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स आहेत. भविष्यातही अनेक प्रकल्पांवर ही कंपनी काम करणार आहे. त्यामुळे रियल इस्टेट क्षेत्रात या कंपनीने आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.