Stock Market Today: शेअर बाजारात अस्थिरतेची शक्यता! जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा परिणाम
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठा बदल! खरेदीपूर्वी नक्की वाचा आजचा भाव
गुरुवारी, सलग दुसऱ्या सत्रात विक्रीचा जोर कायम ठेवत भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि बेंचमार्क निफ्टी ५० २४,२०० च्या पातळीखाली बंद झाला. सेन्सेक्स ८५२.४९ अंकांनी, म्हणजेच १.०९ टक्क्यांनी घसरून ७७,६६४.०० वर बंद झाला, तर निफ्टी ५० २०५.०५ अंकांनी, म्हणजेच ०.८४ टक्क्यांनी घसरून २४,१७३.०५ वर स्थिरावला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक ८१९.४५ अंकांनी, म्हणजेच १.४३ टक्क्यांनी घसरून ५६,३०५.०० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार इन्फोसिस, टाटा कॅपिटल, अदानी एनर्जी सोल्युशन्स, सायंट, एलटीआयमाइंडट्री, सिप्ला, इंडियन एनर्जी एक्सचेंज, महिंद्रा लॉजिस्टिक्स, यूटीआय असेट मॅनेजमेंट कंपनी या शेअर्सवर लक्ष ठेऊ शकतात. निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आजच्या व्यवहारात खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची शिफारस केली आहे. राजा व्यंकटरमण यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, मॅनकाइंड फार्मा लिमिटेड, कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड, साई लाईफ सायन्सेस लिमिटेड आणि गरवारे हाय-टेक फिल्म्स लिमिटेड यांचा समावेश आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी साई लाईफ सायन्सेस, ब्लॅक बॉक्स, नोसिल, प्रिवी स्पेशालिटी केमिकल्स आणि ग्रॅन्युल्स इंडिया या पाच शेअर्सची शिफारस केली आहे.
प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी किंवा विक्री करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, नोसिल आणि कोलपाल यांचा समावेश आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज , श्रीराम फायनान्स, इंडसइंड बँक, अदानी ग्रीन एनर्जी, कॅन फिन होम्स, चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन, डीसीबी बँक, हिंदुस्तान झिंक, लोढा डेव्हलपर्स, एल अँड टी फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस, मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स, सुप्रीम पेट्रोकेम, टॅनला प्लॅटफॉर्म्स आणि झेनसार टेक्नॉलॉजीज आज त्यांच्या तिमाही कमाईची घोषणा करणार आहेत.






