फोटो सौजन्य- सोशल मीडिया
शेअर बाजार (Stock Market) हे असे क्षेत्र आहे जिथे असंख्य लोकांनी अपार संपत्ती कमावली आहे, तर काहींनी आपली सर्व संपत्ती गमावली आहे. काही वर्षांपूर्वी अनेकांना शेअर बाजाराविषयी अनेकांना कुतूहल होते मात्र आज असंख्य लोक या शेअर बाजारात गुंतवणुक करत आहेत. यशस्वी गुंतवणुकीसाठी बाजाराची सखोल समज आणि ज्ञानाची आवश्यकता असते. जर तुम्हाला मार्केट किंवा विशिष्ट स्टॉकबद्दल चांगले ज्ञान असेल, तर तुम्ही त्या माध्यमातून मोठा नफा मिळवू शकता. सध्या बाजारात एका मल्टीबॅगर शेअरची चर्चा आहे कारण या शेअरने गुंतवणूकदारांना 6 महिन्यांमध्ये तब्बल 200 टक्क्याहून जास्त परतावा दिला आहे. जाणून घेऊया या शेअरबद्दल
मल्टिबॅगर शेअर
आपण ज्या मल्टिबॅगर स्टॉकबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव आहे स्काय गोल्ड लिमिटेड (Sky Gold Ltd). ही कंपनी जेम्स अँड ज्वेलरी (रत्ने आणि दागिने) क्षेत्रात कार्यरत आहे. स्काय गोल्डच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत 255 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे, तर एका वर्षात या शेअर्सनी 339 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षांत, या शेअरने 1740 टक्क्यांहून अधिक परतावा देत गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. उदाहरणार्थ, 6 जानेवारी 2023 रोजी या कंपनीच्या एका शेअरची किंमत 224 रुपये होती, जी आता 4120 रुपयांपर्यंत वाढली आहे, म्हणजेच जवळपास 1700 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.
शेअरधारकांना मिळाला लाखोत नफा
जर कोणी 6 जानेवारी 2023 रोजी स्काय गोल्डच्या शेअर्समध्ये 1 लाख 12 हजार रुपये गुंतवले असते, तर आज ती गुंतवणूक 20 लाख 60 हजार रुपयांपर्यंत पोहोचली असती. इतका जास्त परतावा तुम्हाला सोनं, चांदी किंवा प्रॉपर्टीमध्येही मिळू शकणार नाही.
स्काय गोल्डबद्दल
स्काय गोल्ड लिमिटेडच्या फंडामेंटल्सचा विचार करता, या कंपनीचा मार्केट कॅप 6008 कोटी रुपये आहे. स्टॉकचा PE (प्राइस टू अर्निंग रेशो) 74.6 आहे. शेअरचा ROCE (रिटर्न ऑन कॅपिटल एंप्लॉयड) 18.7 टक्के आहे, तर बुक व्हॅल्यू 254 रुपये आहे. ROE (रिटर्न ऑन इक्विटी) 23.6 टक्के आहे. या स्टॉकचे फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. या आकडेवारीवरून या कंपनीच्या शेअर्सची वाढ चांगली असल्याचे दिसते.
गुंतवणुकीपूर्वी हे लक्षात असूद्या
महत्त्वाचे म्हणजे, शेअर बाजारात गुंतवणूक नेहमीच जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. बाजारात बदल होण्याची शक्यता नेहमीच असते, त्यामुळे कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घेणे महत्त्वाचे आहे.
(टीप- वरील माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने दिली जात आहे. येथे दिलेली माहिती वाचकांनी गुंतवणुकीसाठी सल्ला म्हणून घेऊ नये. शेअर बाजारात गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आम्ही कोणालाही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)