स्टँडर्ड चार्टर्डचा क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओ फेडरल बँकेकडे; रिटेल कर्ज व्यवसायाला मोठी चालना
हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, फेडरल बँकेचा क्रेडिट कार्डग्राहकवर्ग विस्तारला जाणार आहे आणि उच्च दर्जाचा त्याचबरोबर अनुभवी ग्राहकवर्गजोडला गेल्याने ‘टियर-१’ शहरांमध्ये फेडरल बँकेचाग्राहकविस्तार आणखी भक्कम होणार आहे. या व्यवहारामुळे फेडरल बँकेच्या ‘रिटेल रिलेशनशिप’ धोरणाला वेग मिळेल; तसेच, या करारामुळे बँकेला रिटेल श्रेणीतीलग्राहकांशी, विशेषतःकोणत्याही ब्रँडसोबत भागीदारी नसलेल्या क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले स्थान अधिक मजबूतकरता येणार आहे. सदर व्यवहारामुळे स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला भारतातीलत्यांच्या संपत्ती व्यवस्थापन आणि श्रीमंत/उच्च उत्पन्न गट या विभागांवर अधिक लक्षकेंद्रित करण्यास मदत होणार आहे.
तसेच ‘एकल उत्पादन’ संबंधांऐवजी ग्राहकांशी अधिक व्यापक आणि बहुआयामी संबंधठेवण्याच्या बँकेने यापुर्वी जाहीर केलेल्या रणनितीला यामुळे गती मिळणार आहे. फेडरल बँकेतर्फे अधिग्रहण केल्या जाणाऱ्या यापोर्टफोलिओमध्ये सुमारे ४.५ लाख क्रेडिट कार्ड्सचा समावेश आहे. याउलट, फेडरल बँकेकडे सध्या स्वतःची आठ लाख ‘नॉन-को-ब्रँडेड’ कार्ड्स आणि १३ लाख ‘को-ब्रँडेड’ कार्ड्स असा ग्राहकसंच आहे. याअधिग्रहणामुळे फेडरल बँकेच्या ‘नॉन-को-ब्रँडेड’ क्रेडिट कार्ड्सवरील थकीत रकमेत अंदाजे ९० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. कार्ड्सची नेमकी संख्या ही प्रत्यक्षहस्तांतरणाची वेळ आणि संबंधित ग्राहकांची संमती यावर अवलंबून असेल.
फेडरल बँकेच्याअंदाजानुसार या पोर्टफोलिओचे मूल्य ‘अंतर्निहित इक्विटी’च्या सुमारे १.५ ते १.६ पट निश्चितकरण्यात आले आहे. या व्यवहारासाठी फेडरल बँक जी अंतिम रक्कम देईल, ती हस्तांतरणाच्या वेळी कार्ड्सवरअसलेल्या प्रत्यक्ष थकीत रकमेवर आधारित असेल. भौगोलिक विस्तार विचारात घेता, हे अधिग्रहण फेडरल बँकेसाठी रणनीतीच्यापातळीवर मोठे पाऊल ठरले आहे. अधिग्रहण करण्यात येणाऱ्या कार्ड ग्राहकांपैकी सुमारे७५ टक्के ग्राहक भारतातील पहिल्या ८महत्त्वाच्या शहरांमध्ये स्थायिक आहेत. त्यामुळे या प्रमुख शहरांमधील फेडरल बँकेचीउपस्थिती दुप्पट होणार आहे. या व्यवहारामुळे मोठ्या मेट्रो (‘टायर-१’) बाजारपेठेतील बँकेचा विस्तार मोठ्याप्रमाणावर वाढणार आहे.
तसेच मोठ्या शहरातील आर्थिकदृष्ट्या सक्रिय असलेल्याग्राहकांपर्यंत बँक अधिक प्रमाणात पोहोचणार आहे. उच्च उत्पन्न असलेल्या शहरीविभागातील ग्राहकांशी घट्ट नाते निर्माण करण्याच्या बँकेच्या धोरणाला यामुळे अधिकबळ मिळणार आहे. कराराबाबत भाष्य करताना फेडरल बँकेचे एमडी आणि सीईओ के. व्ही. एस. मनियन म्हणाले, “सदरअधिग्रहण आमच्या ‘रिटेल क्रेडिट’ व्यवसायासाठी एक अत्यंत प्रभावी आणिधोरणात्मक पाऊल आहे. आम्ही अधिग्रहित करत असलेला पोर्टफोलिओ अतिशय उत्तम दर्जाचाआहे. या पोर्टफोलिओमध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले सक्रिय क्रेडिट कार्ड ग्राहक आहेतआणि हे ग्राहक आमच्या धोरणाशी सुसंगत असलेल्या बाजारपेठांमध्ये केंद्रित झालेलेआहेत. यामुळे आमच्या वेगाने वाढत असलेल्या क्रेडिट कार्ड व्यवसायाला अधिक गतीमिळेल. या अनुभवी ग्राहकांना अधिकाधिक उत्तम सेवा देण्याची आणि त्यांच्याशीदीर्घकालीन नाते निर्माण करण्याची ही आमच्यासाठी एक मोठी संधी आहे आणि याचसंधीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासाठी सर्वाधिक पसंतीचे बँकिंग साथीदार बनू शकणारआहोत.”
फेडरल बँकेचे कंझ्युमर बँकिंग नॅशनल हेड विराट सुनील दिवाणजी याप्रसंगी म्हणाले, “स्टँडर्डचार्टर्डच्या या ग्राहकांचे फेडरल बँक मंचावर आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत आणि त्यांच्याशीसंवाद साधण्यास आम्ही अतिशय उत्सुक आहोत. हे स्थिंततर कोणत्याही अडथळ्याविना आणि अतिशयसुरळीत पध्दतीने पार पाडण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या प्रक्रियेदरम्यानग्राहकांना फेडरल बँकेच्या सर्व वित्तीय योजनांचा आणि सेवांचा लाभ मिळेल. या नवीनग्राहकांशी अधिक बळकट आणि चिरस्थायी नाते निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहणारआहे.”स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे एमडी आणि वेल्थ अँड रिटेल बँकिंग (भारत आणि दक्षिणआशिया) प्रमुख आदित्य मांडलोई कराराबाबत बोलताना म्हणाले, “हा निर्णय आमच्याग्राहकांशी अधिक दृढ आणि बहुआयामी सेवा देणारे संबंध निर्माण करण्याच्या धोरणात्मकबदलाला अनुसरून टाकलेले पाऊल आहे.
क्रेडिट कार्ड्स व्यवसाय हा आमच्या सेवांचा एकमुख्य भाग कायम राहतील; त्याचबरोबरआम्ही आमच्या ‘वेल्थ प्लॅटफॉर्म’ला अधिकाधिक बळकट करण्यासाठी आणिश्रीमंत ग्राहकांसाठीना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी गुंतवणूककरत आहोत आणि त्यामध्ये नुकत्याच शुभांर करण्यात आल्या ‘मेटल बियाँड क्रेडिट कार्ड’चाहीसमावेश आहे. स्टँडर्ड चार्टर्डसाठी भारत ही अतिशय महत्त्वाची बाजारपेठ आहे. याबाजारपेठेत आम्ही गुंतवणूकीवर भर देणार आहोत. तसेच येथील बाजारपेठेतील आमचीउपस्थिती अधिक सक्षम करण्यावर भर राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना अखंड सेवा देतायेईल. आमच्या ग्राहकांसाठी हे स्थितंतर सुलभ आणि सुरळीत होण्यासाठी आम्ही फेडरलबँकेसोबत एकत्रित काम करत राहणार आहोत.”प्रस्तावित व्यवहारासाठी कोणत्याही नियामक मंजुऱ्यांची आवश्यकता नाही आणि हाव्यवहार यंदाच्या वर्षात म्हणजेच २०२६ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सदरअधिग्रहणास लागू असलेल्या नियामक आवश्यकतांचे पालन करून, योग्य वेळी यासंबंधीचे आगामी तपशीलजाहीर केले जाणार आहेत. व्यवहारासाठीचे सल्लागारअर्पवुड कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था फेडरल बँकेची अनन्य वित्तीयसल्लागार म्हणून कार्यरत आहे.खेतान अँड कंपनी ही संस्था फेडरल बँकेची कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरतआहे.केपीएमजी संस्था फेडरल बँकेची ची ‘ड्यूडिलिजन्स’ (यथायोग्य तपासणी)सल्लागार म्हणून कार्यरत आहे.ट्रायलीगल ही संस्था स्टँडर्ड चार्टर्ड बँक, भारत यांची कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत आहे.






