Standard Chartered Banking India: स्टँडर्ड चार्टर्डकडून भारतात नव्या ‘प्रायॉरिटी बँकिंग’ प्रस्तावाची घोषणा! जाणून घ्या सविस्तर (फोटो-सोशल मीडिया)
स्टँडर्ड चार्टर्डने लॉन्च केला एका नव्या रूपात प्रायॉरिटी बँकिंग प्रस्ताव
Standard Chartered Banking India: स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या वेल्थ आणि अॅफ्लूएन्ट सेगमेन्टच्या धोरणानुसार, आज बँकेने भारतात आपल्या नव्याने सादर केलेल्या प्रायॉरिटी बँकिंग प्रस्तावाची घोषणा केली. या नव्या रूपात सादर होणारा प्रायॉरिटी प्रस्ताव चार मुख्य स्तंभांवर आधारित आहे. यामध्ये वेल्थ कौशल्य, आंतरराष्ट्रीय बँकिंग, विक्री आणि सेवेतील कौशल्य यांचा समावेश आहे. ते सर्व मिळून बँकेची मूलभूत ताकद तसेच एक वैशिष्ट्यपूर्ण आणि एकीकृत बँकिंग अनुभव प्रदान करण्याचा दृष्टिकोन दाखवतात. कारण, ग्राहकांच्या आर्थिक गरजा अधिक आधुनिक आणि जागतिक होत आहेत.
नव्या रूपात सादर होणारा हा प्रायॉरिटी प्रस्ताव उत्पादन-केंद्रित सहभागापासून बाहेर पडून, ग्राहकांसोबत अधिक सखोल, मल्टी-प्रॉडक्टकडे वळणारा बदल दर्शवितो, ज्याचा उद्देश त्यांच्या बदलत्या आर्थिक गरजांनुसार त्यांना अधिक पाठबळ देण्याचे आहे. हा प्रायॉरिटी प्रस्तावाच्या केंद्रस्थानी बँकेचे वेल्थ नैपुण्य आहे, जे स्टँडर्ड चार्टर्ड आणि तिच्या सिक्युरिटीज शाखेद्वारे देण्यात येणाऱ्या व्यापक सोल्यूशन्सच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांची संपत्ती वाढविण्यास, तिचे व्यवस्थापन आणि रक्षण करण्यास सक्षम करते.
हेही वाचा: US AI Services: भारत-चीनसाठी अमेरिकन संसाधनांचा वापर का? ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवरो यांचा हल्ला
समर्पित INSEAD प्रशिक्षित वेल्थ तज्ज्ञ आणि रिलेशनशिप मॅनेजर्सची ही टीम ग्राहक अनुभवाची निरंतर उच्च गुणवत्ता सुनिश्चित करते. बँक आपल्या विद्यमान शाखांमधील समर्पित प्रायॉरिटी बँकिंग केंद्रांद्वारे ग्राहकांना त्यांच्या विशेष गरजांनुसार खास तयार केलेले, वैयक्तिकृत अनुभव देण्यासाठी देखील गुंतवणूक करत आहे. हा प्रस्ताव स्टँडर्ड चार्टर्ड ग्रुपचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क सादर करतो, ज्यामुळे ग्राहक डिजिटल क्षमता, क्रॉस-बॉर्डर बँकिंग सोल्यूशन्स आणि सेवांच्या सहयोगाने, आपल्या जागतिक जीवनशैलीशी सुसंगत राहून आपल्या संपत्तीचे सीमा पार व्यवस्थापन करू शकतील.
हा प्रस्ताव ‘प्रायॉरिटी एक्सक्लुझिव्ह्ज’द्वारे आणखी सशक्त करण्यात आला आहे, जो खास पसंतीची लाइफस्टाइल, प्रवास आणि वेलनेस विशेषाधिकार प्रदान करतो. ‘प्रायॉरिटी एक्सक्लुझिव्ह्ज’मध्ये लाइफस्टाइल फायदे आणि अनुभवांपर्यंत पोहोच मिळणे सामील आहे. तसेच, बियॉन्ड क्रेडिट कार्ड, जे ग्राहकांसाठीचे केवळ इन्व्हाईट वर मिळणारे मेटल कार्ड असून ते जागतिक भारतीयांच्या आकांक्षांशी सुसंगत आहे.
उद्योगातील तज्ज्ञांच्या एका खास बनवलेल्या नेटवर्कच्या माध्यमातून ग्राहक बँकिंगच्या पालिकडचा विशेष आधार देखील मिळवू शकतात जसा की, जागतिक शिक्षण, आंतरराष्ट्रीय नागरिकतेबाबत मदत आणि आंतरराष्ट्रीय रिलोकेशन. या खास बनवलेल्या ऑफर्स ग्राहकांसाठी SC प्रिव्हिलेजिस मार्फत उपलब्ध आहेत, जो एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, ज्यात खास निवडलेले अनुभव आहेत.
या प्रसंगी बोलताना, आदित्य मंडलोई, प्रमुख, वेल्थ अँड रिटेल बँकिंग, भारत आणि दक्षिण आशिया, स्टँडर्ड चार्टर्ड म्हणाले, “आमच्या वेल्थ आणि रिटेल बँकिंग व्यवसायासाठी भारत एक धोरणात्मक ग्रोथ मार्केट आहे. नव्या रूपात सादर होणारा आमचा प्रायॉरिटी प्रस्ताव आमच्या बियॉन्ड क्रेडिट कार्डच्या लॉन्चसह, वेल्थ आणि अॅफ्लूएन्ट सेगमेन्टमध्ये अधिक ताकदीने आमची उपस्थिती नोंदवण्याची वचनबद्धता दर्शवितो. आमचे जागतिक नैपुण्य, सहज डिजिटल प्लॅटफॉर्म आणि निवडक लाइफस्टाइल लाभ यांचा उपयोग करून आम्ही ग्लोबल इंडियन ग्राहक वर्गाच्या महत्त्वाकांक्षांचे समर्थन करण्यासाठी वचनबद्ध आहोत. ग्राहकांना त्यांच्या बदलत्या गरजांशी सुसंगत जागतिक दर्जाचे, वैयक्तिक साहाय्य मिळावे हे सुनिश्चित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
आदित्य मंडलोई पुढे म्हणाले, “आमच्या ग्राहकांचा विश्वास, आमचे जागतिक नेटवर्क आणि वेल्थ नैपुण्य स्टँडर्ड चार्टर्डला एक आघाडीची आंतरराष्ट्रीय वेल्थ कंपनी म्हणून बळकटी देतात. आमच्या ग्राहकांना वैयक्तिक आणि व्यवसाय गरजांनुरूप सर्वांगीण सेवा प्रदान करण्याभोवती आमचे धोरण आखलेले आहे, ज्याला उत्कृष्ट आणि सुसंगत ग्राहक अनुभवाचे पाठबळ मिळाले आहे.”






