US AI Services: भारत-चीनसाठी अमेरिकन संसाधनांचा वापर का? ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवरो यांचा हल्ला (फोटो-सोशल मीडिया)
US AI Services: व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे जवळचे विश्वासू पीटर नवरो यांनी एक नवीन वाद निर्माण करून नव्या वादाला आमंत्रित केल्याचे दिसून येते आहे. AI च्या वापरावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता सेवा पुरवण्यासाठी अमेरिकन संसाधने आणि वीज का वापरली जात आहे. तसेच, भारत-चीनसाठी अमेरिकन संसाधनांचा वापर का? ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवरो यांनी असा सवाल विचारात हल्ला चढवला आहे.
हे देखील वाचा: Micro Loan Scheme India: गिग कामगारांसाठी खुशखबर! एप्रिल २०२६ पासून केंद्र सरकार घेऊन येतीये ‘ही’ खास योजना
रिअल अमेरिकाज व्हॉइस वरील संभाषणादरम्यान, व्यापार सल्लागार पीटर नवरो यांनी असा युक्तिवाद केला की, चॅटजीपीटी (ChatGPT) सारखे अमेरिकन एआय (Artificial Intelligence) प्लॅटफॉर्म देशांतर्गत (अमेरिकन) वीज वापरत आहेत, तर त्यांचा सर्वात मोठा वापरकर्ता अर्थात परदेशात आहे.पीटर नवरो यांनी भारताला टॅरिफचा राजा म्हटले आणि दावा केला की, भारत हा सर्वाधिक शुल्क लादणारा जगातील आघाडीचा देश आहे. त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या टिप्पण्या पुन्हा सांगितल्या की, भारत रशियन तेल आयातीतून सुमारे कोट्यवधी रुपये कमवत आहे, जे रशियाच्या युक्रेन युद्ध यंत्राला निधी देत आहे.
हे देखील वाचा: Ujjwala Yojana Subsidy: उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा? महागाईवर उपाय म्हणून गॅस सबसिडी वाढवण्याची शक्यता
त्यांनी भारताला क्रेमलिनचे कपडे धुण्याचे दुकान म्हटले आणि युक्रेन युद्धाचा उल्लेख मोदींचे युद्ध असाही केल्याने अमेरिका-भारत यांच्या संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याव्यतिरिक्त, व्यापार सल्लागार पीटर नवरो यांनी अमेरिकन शेतजमिनी खरेदीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की परदेशी संस्था वास्तविक किंमतीपेक्षा १० पट जास्त किंमतीत अमेरिकन शेतजमिनी खरेदी करत आहेत, ज्यामुळे अमेरिकेत अन्न आणि किरकोळ महागाई वाढू शकते. तसेच, त्यांनी असाही प्रश्न उपस्थित केला की, अमेरिकन लोक भारतात एआयसाठी पैसे का देत आहेत? चॅटजीपीटी अमेरिकेच्या भूमीवर चालते आणि अमेरिकन वीज वापरते, जरी ते भारत आणि चीनसारख्या ठिकाणी मोठ्या संख्येने वापरकत्यांना सेवा देते.






