(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Starbucks Layoffs Update: जागतिक परिस्थिती बिकट होत चालली असताना नवं संकट सगळ्यांसमोर उभं राहत आहेत. मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीची लाट पसरली आहे. कर्मचारी कपातीचा नुसता उल्लेख जरी झाला, तरी कर्मचाऱ्यांच्या अंगावर अनेकदा काटा येतो. कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी ही बाब भयानक आहे. या पार्श्वभूमीवर, जगातील सर्वात मोठी कॉफीहाऊस आणि रोस्टरी चैन असलेल्या ‘स्टारबक्स’ने अमेरिकेतील कर्मचारी कपातीबाबत एक मोठी घोषणा केली आहे. काय होणार आहे नेमका परिणाम? आणि काय आहे नेमकी बातमी ? समजून घेऊयात.
हुशशश… Iran युद्ध संपुष्टात येणार! Donald Trump यांचा मोठा दावा, ‘तेलाच्या किमती क्रॅश होतील…’
अमेरिकेत, Back to Starbucks धोरणांतर्गत, मुख्य कार्यकारी अधिकारी बुरियन निकोल यांनी स्टारबक्सच्या सुमारे १०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. दरम्यान, लिव्हस्टीन ट्रिब्यून आणि सिटल्स ट्रिब्यून यांच्या वृत्तानुसार, कर्मचारी कपातीमध्ये सुमारे २५२ कर्मचाऱ्यांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. स्टारबक्सच्या माहितीनुसार, कंपनीने गेल्या आठवड्यात ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये प्रशासकीय सहाय्यक, व्यवस्थापक आणि विविध उपाध्यक्ष यांसारखी महत्त्वाची पदं भूषवणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, निकोल यांनी कंपनीचे नेतृत्व स्वीकारल्यापासून, कंपनीतील कर्मचारी संख्या सातत्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ‘बॅक टू स्टारबक्स’ धोरणांतर्गत हा कल दिसून येतोय. परिणामी, कंपनी आता खर्च कपातीचे उपाय, कामकाजातील कार्यक्षमता आणि दीर्घकालीन धोरणात्मक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. The Seattle Times च्या वृत्तानुसार, फेब्रुवारी २०२५ पासून वॉशिंग्टनस्थित कंपनी स्टारबक्सने आपल्या कर्मचारी वर्ग, स्टोअर्स, किरकोळ विक्री केंद्रे आणि ‘रोस्टरी’ शाखांमधील मिळून २,००० हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
सिएटलमध्ये जारी केलेल्या एका निवेदनात, स्टारबक्सच्या प्रवक्त्याने या निर्णयाला कंपनीला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हटले आहे. त्यांनी नमूद केले की, या निर्णयामुळे भक्कम वाढीला चालना मिळेल आणि कंपनीला अधिक कार्यक्षमतेने काम करणे शक्य होईल. कंपनीच्या अलीकडील आर्थिक कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, स्टारबक्सने एका वर्षाच्या कालावधीतील ९.५ अब्ज डॉलर्सच्या विक्रीवर अंदाजे ५११ दशलक्ष डॉलर्सची कमाई नोंदवली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कंपनीचा अंदाज आहे की तिच्या आगामी उपक्रमांसाठी अंदाजे ४०० दशलक्ष डॉलर्सचा खर्च येईल. या आकड्यात कर्मचारी कपातीशी संबंधित खर्च तसेच तिच्या स्थावर मालमत्ता पोर्टफोलिओमधील बदलांचा समावेश आहे.






