8 मोठ्या कारणांमुळे बाजार कोसळला, घसरण वाढणार की थांबणार? (फोटो सौजन्य-X)
Stock Market Crashed News in Marathi : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांचे मूल्यांकन फक्त ५ दिवसांत १६ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. शुक्रवारी (26 सप्टेंबर 2025) ही घसरण जवळपास ७ लाख कोटी रुपयांची होती. जी संपूर्ण आठवड्यातील सर्वात मोठी घसरण होती. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सेन्सेक्स ७३३.२२ अंकांनी घसरून ८०,४२६.४६ वर बंद झाला, तर निफ्टी २३६.१५ अंकांनी घसरून २४,६५४.७० वर बंद झाला.
आठवड्यात सेन्सेक्स २,०९७.६३ अंकांनी म्हणजेच २.५४% ने आणि निफ्टी ६३१.८० अंकांनी म्हणजेच २.५०% ने घसरला आहे. बँक निफ्टीमध्येही लक्षणीय घसरण दिसून आली आहे. या आठवड्यात बाजार प्रत्येक सत्रात घसरणीसह बंद झाला आहे. या काळात बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १६ लाख कोटींनी घसरले आहे. यामागची नेमकी कारण काय आहे जाणून घ्या…
परदेशातून कमकुवत पाठिंब्यामुळे आशियाई बाजारांवर दबाव आहे. सोन्याच्या मजबूतीमुळेही शेअर बाजारात तणाव निर्माण होत आहे. अमेरिकेसोबतचे व्यापारी संबंध अद्याप अस्पष्ट आहेत. परदेशी गुंतवणूकदारही विक्रीवर लक्ष केंद्रित करत आहेत. भारतीय बाजार केवळ देशांतर्गत बाजारावर अवलंबून आहे. त्यामुळे सोमवारी बाजारात काय होईल? हे निश्चित करणे कठीण आहे, परंतु तज्ञांचे म्हणणे आहे की बाजाराला वाढीसाठी काही आधाराची आवश्यकता आहे.ट