(फोटो सौजन्य: istock)
अनेकदा उत्साहात आपण हाॅटेलमध्ये गेल्यावर काही सामान्य चुका करतो ज्यामुळे आपला खिसा रिकामा होण्याची शक्यता असते. तुम्हीही पहिल्यांदाच कुटुंबासोबत हाॅटेलमध्ये राहणार असाल तर या स्मार्ट टिप्स तुमच्या चांगल्याच कामी येतील. याच्या मदतीने तुम्ही तुमची ट्रिप आनंदाने आणि कोणत्याही तणावाशिवाय घालवू शकता.
Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट
चेकिंगदरम्यान आयडी आणि बुकिंग पेपर्स न ठेवण्याची चूक
अनेकांना हे ठाऊक नाही पण हाॅटेलमध्ये चेक-इन करताना आपल्याकडे आपला आधार कार्ड, पासपोर्ट किंवा बुकिंग कंफर्मेशनची प्रिंटआउट असणे फार गरजेचे असते. तुमच्याकडे ते नसल्यास चेक-इन करताना तुमच्या समस्या वाढू शकतात. यामुळे तुमची बुकिंग प्रोसेस वाढेल ज्यामुळे तुम्हाला रुम लेट मिळतील आणि परिणामी तुमची सर्व प्लॅनिंग बिघडेल.
हिडन चार्जेसना ओळखा
बऱ्याच हाॅटेल्समध्ये रुमच्या आतमध्ये एक छोटा फ्रिज ठेवला जातो ज्यात पाण्याची बाॅटल आणि काही कोल्ड ड्रिंक्स ठेवलेले असतात. आता रुम आपली तर हे सामान देखील त्यासोबत फ्रि असावं असा विचार अनेकजण करतात पण तसं नाहीये. लक्षात घ्या, अधिकतर वेळी पाण्याची बाॅटल आणि टी-मेकर मोफत दिला जातो पण अन्य वस्तूंचे तुम्हाला पैसे द्यावे लागतात.
चेक-आउट करताना केली जाणारी चूक
प्रत्येक हाॅटेलमध्ये चेक-इन आणि चेक-आउटची एक निश्चित वेळ असते. अनेकदा पहिल्यांदा राहत असलेल्या प्रवाशांना असं वाटतं की दिवस संपेपर्यंत आपण कधीही हाॅटेल रुम सोडलेली चालते पण तसं नाहीये. तुम्ही जितके तास जास्त त्या रुममध्ये राहता तितके तुम्हाला अधिक पैसे द्यावे लागतात. यामुळेच रुम निश्चित वेळेत सोडणेच फायद्याचे ठरते.
हाॅटेलची लोकेशन आणि रिव्यूज न पाहणे
हाॅटेलचे सुंदर फोटोज आणि कमी किंमत पाहूण रुम बुक करण्याची घोडचूक करु नका. जर हाॅटेल शहरापासून फार लांब असेल तर तुमचा बराच वेळ प्रवासात जाऊ शकतो. यामुळेच हाॅटेल बुक करताना कधीही शहराच्या जवळ असलेले हाॅटेल बुक करावे म्हणजे प्रवासात आपला वेळ खर्च होत नाही.
सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे
कोणत्याही हाॅटेलमध्ये राहताना आपण आपल्या सुरक्षेला पहिले प्राधान्य द्यायला हवे. हाॅटेलमध्ये गेल्यावर कधीही आपल्या रुमचा दरवाजा सताड खुला ठेवू नये. यासोबतच तुम्हाला मिळालेल्या रुमच्या कि-कार्डला देखील सांभाळून ठेवा. यासोबत स्टाफसोबत जर तुम्ही वाईट वर्तन केले तर त्याच्या तुमच्या सर्विसवर परिणाम होऊ शकतो. हाॅटेल स्टाफ जसं की, हाउसकीपिंग किंवा बेलबाॅयसोबत चांगला व्यावहार करा. रुममधून बाहेर निघताना नेहमी तुमच्या रुमचा दरवाजा ऑटो-लाॅक झाला आहे की नाही ते चेक करा.






