मादुरो गेले, पण अच्छे दिन आले! भारतीय तेल कंपन्यांसाठी व्हेनेझुएला वरील हल्लाही 'अशा' प्रकारे ठरणार वरदान ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India-Venezuela Crisis : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशात अमेरिकेने केलेल्या अनपेक्षित लष्करी कारवाईने जागतिक राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांची अटक आणि व्हेनेझुएलाच्या विस्तीर्ण तेल साठ्यांवर अमेरिकेने मिळवलेले नियंत्रण, ही केवळ एका देशातील सत्तांतर नसून जागतिक ऊर्जा बाजारातील मोठी क्रांती मानली जात आहे. मात्र, या सर्व गोंधळात भारतासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेचा हा ‘ऑपरेशन अॅब्सोल्यूट रिझॉल्व्ह’ भारतासाठी अब्जावधी डॉलर्सचा फायदा करून देणारा ठरू शकतो.
भारताची सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज कंपनी ONGC विदेश लिमिटेड (OVL) ने व्हेनेझुएलातील सॅन क्रिस्टोबल (San Cristobal) तेल क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र, २०१४ पासून व्हेनेझुएला सरकारने भारताला मिळणारा लाभांश (Dividend) दिलेला नाही. ही रक्कम आता सुमारे १ अब्ज डॉलर्स (जवळपास ८,३०० कोटी रुपये) इतकी झाली आहे. अमेरिकन निर्बंधांमुळे हे पैसे भारताला आणता येत नव्हते. आता अमेरिकेने तिथल्या अर्थव्यवस्थेवर आणि तेल विक्रीवर ताबा मिळवल्याने, हा थकीत पैसा भारतीय तिजोरीत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Maduro Arrested: हुकूमशहांचा काळ जवळ! अमेरिकेची पुढची शिकार होणार ‘Putin’; झेलेन्स्की यांच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
सध्या सॅन क्रिस्टोबल क्षेत्रातून दररोज केवळ ५,००० ते १०,००० बॅरल तेल उत्पादन होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तांत्रिक उपकरणांची कमतरता आणि अमेरिकन निर्बंध. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. ओएनजीसीकडे गुजरातमध्ये उपलब्ध असलेले आधुनिक ‘रिग्स’ आणि उपकरणे व्हेनेझुएलात पाठवून हे उत्पादन दररोज ८०,००० ते १,००,००० बॅरलपर्यंत नेले जाऊ शकते. यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक भक्कम होईल आणि आखाती देशांवरील अवलंबित्व कमी होईल.
Good morning everyone… There are only 24 hours between the two photos. Maduro has now been brought to the United States. Trump openly stated that they will control Venezuela’s oil and the country itself. We’re talking about 303 billion barrels of oil, roughly worth 18… pic.twitter.com/0dl4DUXEB3 — Arif (@oztrkarif09) January 4, 2026
credit : social media and Twitter
भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), नायरा एनर्जी आणि इंडियन ऑइल सारख्या कंपन्यांकडे जड कच्चे तेल (Heavy Crude) शुद्ध करण्याची जगातील सर्वात प्रगत यंत्रणा आहे. व्हेनेझुएलातून मिळणारे तेल हे याच प्रकारचे असते. २०१७-१८ मध्ये भारत दररोज ४ लाख बॅरल तेल तिथून आयात करत होता. २०२० मधील निर्बंधांनंतर हे प्रमाण शून्यावर आले होते. आता अमेरिकेच्या नियंत्रणाखाली व्हेनेझुएलाचे तेल पुन्हा एकदा भारतीय बंदरांवर पोहोचण्यास सुरुवात होईल, ज्यामुळे कच्च्या तेलाचे दर स्थिर राहण्यास मदत होईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Absolute Resolve: 150 विमानं अन् 30 मिनिटांचा थरार! अमेरिकेने मादुरोला ‘असं’ केलं जेरबंद; बेडरूममधून थेट NYC तुरुंगात
आजवर व्हेनेझुएलाच्या तेलावर चीनचा मोठा प्रभाव होता. मादुरो सरकार चीनकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड तेलाच्या माध्यमातून करत होते. मात्र, आता ट्रम्प प्रशासनाने तिथला कारभार हाती घेतल्याने चीनचे वर्चस्व संपले आहे. अमेरिका आता भारतासारख्या लोकशाहीवादी आणि मित्र देशाला व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रात अधिक प्राधान्य देऊ शकते, जे भारताच्या धोरणात्मक (Strategic) हितासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
Ans: भारताचे अडकलेले १ अब्ज डॉलर्सचे कर्ज वसूल होईल आणि कमी किमतीत कच्च्या तेलाचा मोठा स्त्रोत पुन्हा उपलब्ध होईल.
Ans: ओएनजीसीची व्हेनेझुएलातील सॅन क्रिस्टोबल (San Cristobal) तेल क्षेत्रात ४०% भागीदारी असून त्यात कंपनीचे ५३६ दशलक्ष डॉलर्सहून अधिक लाभांश थकीत आहेत.
Ans: भारतीय रिफायनरीज जड कच्चे तेल (Heavy Crude) शुद्ध करण्यात तज्ज्ञ आहेत आणि व्हेनेझुएलाचे तेल इतर देशांच्या तुलनेत स्वस्त पडते.






