(फोटो सौजन्य - iStock)
देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असेलेल्या Tata Motors ने त्यांच्या वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने केलेल्या घोषणेनुसार Tata Motors च्या वाहनांच्या किंमतीमध्ये सुमारे २ टक्क्यांनी वाढ होणार वाढ होणार आहे. Tata Motors चे नवे दर १ जुलैपासून लागू होणार आहेत. याबाबत Tata Motors ने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, वाहने तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किंमती वाढल्याने Tata Motors च्या वाहनांच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. Tata Motors च्या वाहनांवर लागू करण्यात आलेली वाढ प्रत्येक मॉडेल्स आणि प्रकारांनुसार बदलेल.
Tata Motors ने यावर्षी सलग तिसऱ्यांदा व्यावसायिक वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. Tata Motors ने वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवारी २०२४ पासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किंमतीमध्ये ३ टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर १ एप्रिल २०२४ पासून Tata Motors ने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती सुमारे २ टक्क्यांनी वाढणार असल्याचे जाहीर केले. आता तिसऱ्यांदा Tata Motors ने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किंमतीमध्ये सुमारे २ टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे सांगितले आहे. १ जुलै २०२४ पासून Tata Motors चे नवे दर लागू होणार आहेत.
Tata Motors लवकरच नवीन वाहने लाँच करणार आहे. भारत, ब्रिटन, अमेरिका, इटली आणि दक्षिण कोरियामध्ये लवकरच Tata Motors ची नवीन वाहने लाँच केली जाणार आहेत. प्रत्येक देशातील ग्राहकांच्य गरजेनुसार ही बनवली जात आहेत. Tata Motors ची ही सर्व नवीन वाहने आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. Tata Motors च्या मालकीचे असलेले Jaguar आणि Land Rover लवकरच त्यांची लोकप्रिय कार Free Lander नव्या शैलीत लाँच करणार आहेत. यासाठी चीनच्या Chery Automobile सोबत करार करण्यात आला आहे. या करारानुसार Jaguar आणि Land Rover लवकरच Chery Automobile सोबत लोकप्रिय कार Free Lander नव्या शैलीत लाँच करणार आहेत.