११ वी ऑनलाइन प्रवेशाचा धडाका! अवघ्या काही दिवसांत १.४५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी (Photo Credit- AI)
राज्यात सुमारे नऊ हजार ५५१ ज्युनिअर महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पध्दतीने प्रक्रिया राबविण्यात येते. विभागिनहाय पाहता आतापर्यंत मुंबई विभागातून २० हजार ६०० विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे. मुंबईत मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे. पुणे वि भागात १५ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे.
नाशिकमध्ये ६ हजार ९९, काेल्हापूर विभागात ४७६०, अमरावती ४३९०, छत्रपती संभाजीनगर ३९७१, लातूर २६८१, नागपूर ३७२१, यािशवाय वि भागांचा समावेश न केलेल्या १७८ वि द्यार्थ्यांची स्वंतत्र नाेंद आहे. उत्तर प्रदेशातून ८२ हजार ७५५ वि द्यार्थ्यांनी नाेंदणी केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ही नाेंदणी प्रक्रिया ३० एप्रिल २०२६ राेजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरु राहणार आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग पूर्ण करणे बंधनकारक असून अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकर नाेंदणी करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. नाेंदणी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालानंतरच्या पुढील टप्प्यात महाविद्यालयांचा पसंतीक्रमाने निवड करता येणार आहे. त्यानंतर प्रवेश याद्या जाहीर हाेवून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.






