एखादी दुर्दैवी घटना घडल्यावर तेवढ्यापुरती हळहळ अन् तेवढ्यापुरती चर्चा आणी आंदोलनाची भाषा करणारी जनतेची मानसिकता येथील अधिकारी, पुढार्यांनी चांगलीच ओळखली असल्याने तालुक्यातील चित्र फारसे काही बदलले नाही. गत अठवडयात म्हसवड शहरातील एक सुपरिचित अशा राकेशच्या अपघाती मृत्युमुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली ही हळहळ व्यक्त करताना राकेशच्या अपघाताला गतिरोधक नसल्यानेच मुृत्यु झाल्याची चर्चा सर्व शहरात सुरु होती, त्याचवेळी शहराला जोडणार्या सर्व रस्त्यांवर गतीरोधक उभारले गेले पाहिजे अशी ही चर्चा शहरात रंगली ही चर्चा एवढी जोरात शहरात सुरु होती की त्यावेळी यासाठी येथील नागरिक आता रस्त्यावर उतरतील असे वाटत होते, मात्र ही म्हसवड ची जनता आहे, ती नेहमी आधी कोण सुरुवात करतोय हेच पहात आली आहे, यावेळीही नेमके तेच झाले राकेशच्या दुर्दैवी मृत्युमुळे ऐरणीवर आलेला गतीरोधकाचा प्रश्न हळुहळु बाजुला पड़ गेला, एकादी दु:खद घटना घडल्यानंतर एखाद्या कुटुंबावर ज्याप्रमाणे आघात होतो त्यानंतर त्या कुटुंबाला धीर दिला जातो त्यानंतर ते कुटुंब हळुहळु त्यातुन सावरते अगदी त्याप्रमाणेच म्हसवड शहराची गाथा आहे, एखादी गंभीर घटना घडली की नुसती त्यावर मोठ, मोठी चर्चा करायची आणी नंतर हळुहळु त्यावर पडदा टाकायचा ही मानसिकता येथील नागरीकांची आहे, ही मानसिकता येथील सर्व नेत्यांनी व अधिकार्यांनी नेमकी ओळखली असल्यानेच म्हसवडकर काय करतील फार, फार तर ओरडतील, चर्चा करतील आणी नंतर शांत बसतील हा चांगलाच समज सर्व नेत्यांचा व अधिकार्यांचा झाला असल्यानेच म्हसवडकरांना हक्काचे आजवर कधी मिळालेच नाही, ना ते मिळवण्यासाठी म्हसवडकरांनी कधी हक्काने प्रयत्न केला नाही ना त्यासाठी कधी आंदोलन उभारले नाही त्यामुळे आजवर येथील जनतेला सर्वांनी गृहीत धरुनच आपली मनमानी केली आहे.
आज अशा अनेक घटना शहरात घडत आहेत मात्र त्यावर फक्त चर्चा केली जाते पण चुकीला चुक म्हणण्याचे धाडस येथील जनता करीत नसल्याने सर्व अधिकारी व नेत्यांचे फावते आहे, खरेतर घटनेने सामान्य जनतेला फार मोठे अधिकार बहाल केलेले आहेत त्याचा कधी सामान्य जनतेने वापरच केला नाही, येथील जनता आपण भले आणी आपले काम भले यातच धन्यता मानत आली आहे. त्यामुळे शहरात कोणी अपघाताने मरो अथवा १०/१२ दिवसांतुन पिण्याचे पाणी मिळो, किंवा विजेचा लंपडाव असो, अथवा वैद्यिकय सेवेचा खेळखंडोबा होवो, या सह इतर अनेक समस्या असो यावर मात्र सर्वजण नेहमीच मौन बाळगण्यात धन्यता मानत आले आहेत. म्हसवडकरांचे हे मौन अधिकार्यांना व नेत्यांना त्यांची मनमानी करण्यास कारणीभुत ठरत आहे, प्रत्येक घटनेचा येथील जनता संबधितांना जेव्हा जाब विचारायला चालु करेल तेव्हाच म्हसवडकरांना त्यांचा हक्क मिळेल अन्यथा एखादी गंभीर घटना घडल्यावरच ही जनता तेवढ्यापुरती चर्चा करेल आणी विषय सोडुन देईल असेच जर होत राहिले तर शहरात साधे गतीरोधक होणे ही दुरापास्त होईल त्यासाठी अनेक राकेशसारख्या तरुणांचे बळीही जातील, भविष्यात असे बळी न जाण्यासाठी म्हसवडकरांनी आता आपल्या न्याय व हक्कासाठी कोणत्याच राजकिय पक्षाचा झेंडा हातात न घेता सिध्दनाथाचे निशान हाती घेवुन संघटित व्हावे आणी आपले प्रश्नाची सोडवणुक करुन घ्यावी वेळ प्रसंगी संबधितांना जाब विचारण्याची हिम्मत दाखवावी तरच म्हसवडकरांना गृहीत धरण्याची हिम्मत कोणी करणार नाही. शेवटी ही नाथ नगरी आहे येथे अति ची नेहमीच माती झाली आहे, त्यामुळे म्हसवडकरांच्या सहनशिलतेचा अंत कोणीही पाहु नये हेच महत्वाचे.
आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात खरेतर तरुणांनी रस्त्यावर उतरुन प्रत्येक संबधित अधिकारी व नेत्यांना जाब विचारला पाहिजे अशी अपेक्षा आजच्या तरुणांकडुन सामान्य म्हसवडकरांना आहे, मात्र आजचा तरुण हा फक्त इंटरनेटच्या फुकट मिळणार्या २ जी.बी. डाट्यातच गुरफटला गेला आहे. त्याने स्वत:ला त्यामध्ये एवढे झोकुन दिले आहे की त्याला आपल्या आजुबाजुला काय घडतयं, आपले हक्क काय, आपले अधिकार काय हेच तो विसरुन गेला आहे.






