(फोटो सौजन्य: Pinterest)
पावसाळ्याचा काळ सुरु आहे, या ऋतूत अनेक झाडांना सुंदर बहार येते ज्यामुळे त्यांचे दृश्य पाहणे आणखीनच मजेदार ठरते. फुलांनी भरलेलं ठिकाण तुम्ही याआधीही अनेक चित्रपटांमध्ये पहिलं असेल मात्र इथे प्रत्यक्षात तुम्ही कधी भेट दिली आहे का? विचार करा, हिरवीगार झाड आणि त्यात बहरलेली हजारो फुलं आणि यातच तुम्ही तुमच्या पार्टनरचा हात पकडून चालत आहात, शांत वातावरण, फुलांचा सुगंध आणि आपल्या जोडीदाराची साथ बस जीवनात आणखीन काय हवं!
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात स्थित एक राष्ट्रीय उद्यान आहे, ज्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देखील देण्यात आला आहे. ३०० हून अधिक प्रकारच्या फुलांनी व्यापलेली ही दरी पर्यटकांमध्ये तिच्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. दरवर्षी १ जून ते ऑक्टोबर या कालावधीत ते पर्यटकांसाठी खुले होते. देश आणि जगातील हजारो लोक दरवर्षी रंगीबेरंगी फुले आणि वनस्पती पाहण्यासाठी या जागेचा भेट देतात आणि येतील बहारदार सौंदर्याचा अनुभव आपल्या मनात दडवून ठेवतात. हा अनुभव तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी अनुभवता येणार नाही. कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून तुम्ही व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला भेट देऊ शकता. इथे कसे जायचं, तसेच इथे जाण्यासाठी काय प्रोसेस आहे, शुल्क किती आहे अशी सर्व माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स का खास आहे?
चला तर मग व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये इतके काय खास आहे ते प्रथम जाणून घेऊया. १९८२ मध्ये याला राष्ट्रीय उद्यान आणि २००५ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. येथे ३०० हून अधिक प्रजातींच्या फुले आढळतात. इथे ब्लू पॉपी, हिमालयीन कॉब लिली आणि ब्रह्मकमल अशी अनेक दुर्मिळ फुले तुम्हाला पाहायला मिळतील. हे इथले नैसर्गिक सौंदर्य नेहमीच पर्यटकांना भुरळ घालतं. फक्त निसर्गप्रेमींसाठीच नाही तर ट्रेकिंग लव्हर्ससाठी देखील हे ठिकाण एक उत्तम पर्याय आहे. येथून हिमालय आणि नंदा देवी पर्वताचे नेत्रदीपक दृश्ये देखील पाहता येतात.
व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला भेट देण्याची प्रोसेस
व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला भेट देण्यासाठी पर्यटकांना आपले रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला भेट देण्यासाठी नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येते. चला ते कसे करायचे ते जाणून घेऊया.
ऑनलाइन नोंदणी
ऑफलाइन नोंदणी
व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या सहलीसाठी किती खर्च येतो?
व्हॅली ऑफ प्लॉयर्सला भेट देण्यावेळी या गोष्टी ध्यानात असूद्यात