फोटो सौजन्य: iStock
विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावीची परीक्षा ही खूप महत्वाची असते. पण याहीपेक्षा महत्वाचे असते ते बारावीनंतर योग्य कॅरिअर ऑप्शन्स निवडणे. अशावेळी अनेक विद्यार्थ्यांचा करिअर निवडण्याच्या बाबतीत गोंधळ उडून जातो. यातही जर तुम्ही आर्टस् मधून बारावी पूर्ण
बारावी कला शाखेत केल्यानंतर, विद्यार्थ्यांना अनेकदा करिअरबाबत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागतो. विज्ञान आणि अभियांत्रिकीसारख्या क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा, कला शाखेचे विद्यार्थी विविध करिअर मार्गांमधून आपले करिअर निवडू शकतात. या पर्यायांमध्ये फॅशन डिझायनिंग, कायदा आणि पत्रकारिता यासारख्या क्रिएटिव्ह क्षेत्रांचा तसेच हॉस्पिटेलिटी, टीचिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट यासारख्या उद्योगांचा समावेश आहे. याशिवाय, कला शाखेचे विद्यार्थी सामाजिक कार्य, कंस्लटेशन आणि इतर अनेक क्षेत्रातही करिअर करू शकतात. चला आपण कला शाखेतील बेस्ट कोर्सेसबद्दल जाणून घेऊया.
ही एक चांगली पदवी आहे, जी इंग्रजी, मानसशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास यासारख्या विषयांमध्ये स्पेशलाइजेशन देते. ग्रेजुएट टीचिंग, रिसर्च आणि विविध अॅडमिनिस्ट्रेटिव्ह भूमिकांमध्ये करिअर करू शकतात.
व्हिज्युअल आर्ट्सची आवड असलेल्यांसाठी BFA हा एक उत्तम कोर्स आहे. यामुळे जाहिरात, ग्राफिक डिझाइन आणि डिजिटल मीडियामध्ये करिअर होऊ शकते.
हा कोर्स फॅशन, इंटीरियर आणि ग्राफिक डिझाइन सारख्या डिझाइन विषयांवर लक्ष केंद्रित करतो. तसेच हा कोर्स विद्यार्थ्यांना विविध उद्योगांमध्ये क्रिएटिव्ह होण्यासाठी मदत करतो.
आजपासून सुरू JEE MAIN B-TECH परीक्षा; कपडे आणि टॉयलेट ब्रेकसाठी ‘हे’ नियम”
ज्यांना पुस्तकांची आवड आहे आणि जे ग्रंथपाल बनू इच्छितात त्यांच्यासाठी हा कोर्स आदर्श आहे. हा कोर्स पुस्तक प्रेमींसाठी परिपूर्ण आहे ज्यांना वाचन आणि वेगवेगळ्या सोर्सेसमधून शिकण्याची आवड आहे.
या अभ्यासक्रमात वाढत्या उद्योगात हॉटेल व्यवसायाच्या पैलूंचा समावेश आहे, ज्यामध्ये ऑपरेशन्स आणि गेस्ट सर्व्हिसचा समावेश आहे.
बॅचलर ऑफ जर्नालिज्म अँड मास कम्युनिकेशन
हा कोर्स विद्यार्थ्यांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसह माध्यमांमधील भूमिकांसाठी तयार करतो.
जर तुम्हाला कायदेशीर सल्लागार बनायचे असेल तर तुम्ही हा कोर्स निवडू शकता. भारतीय कायदा जाणून घेणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी हा एक उत्तम अभ्यासक्रम आहे.